नवी दिल्ली, 8 मार्च : कोरोना व्हायरस (Coronavirus) महासाथीमुळे अमेरिकेवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. अमेरिकेतील आरोग्य सुविधा जगात अव्वल मानली जाते. यादरम्यान जगात प्रसिद्ध अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र म्हणजेच सीडीसीने कोरोना लस घेतल्यानंतर तीन नवे साइड इफेक्ट्स समोर आल्याचा दावा केला आहे. सीडीसीने (Centers for Disease Control and Prevention) आता कोरोना लसीकरणानंतर तीन नवीन साइड इफेक्ट्स समोर आल्याचा दावा केला आहे. सीडीसीने आता जुन्या यादीमध्ये नवीन लक्षणांचा समावेश केला आहे. (Three new side effects occurred after taking Corona Vaccine)
लसीकरणाची जागतिक परिस्थिती
कोरोना लसीकरण अभियानाबद्दल सांगितलं तर जागतिक रुपात 283 मिलियन म्हणजे 28 कोटी तीस लाखांहून जास्त डोस लावण्यात आले आहे. तब्बल 6 कोटी नागरिकांना लसीकरणाचे दोन्ही डोज देण्यात आले आहेत. सर्वात साधारण साइड इफेक्टबद्दल सांगायचं झालं तर कोरोना लस घेतलेल्या भागावर वेदना होतात. तर काही जणांना कमी कालावधीसाठी फ्लूची लक्षणं पाहायला मिळत आहे. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोजनंतर फ्लूची लक्षण पाहायला मिळत आहेत. लसीकरणानंतर गंभीर परिस्थिती उद्भवल्याचे प्रमाण कमी आहे.
हे ही वाचा-चिंता वाढली! कोरोनाचं आणखी एक नवं रूप आलं समोर, लसीचा प्रभावही कमी होण्याची भीती
साइड इफेक्टची यादी
काही दिवसांपूर्वी वैज्ञानिकांनी सांगितलं की, लस घेतल्यानंतर नागरिकांना त्वचेवर चट्टे आणि तो भाग लालसर झाल्याचं पाहायलं मिळतं. ज्यांनी Moderna jab लशीचा पहिला डोज घेतला त्यांच्यामध्ये ही लक्षणं दिसत आहे. (Three new side effects occurred after taking Corona Vaccine)
तीन नव्या साइट इफेक्टनुसार...
सर्वसाधारणपणे लसीकरणानंतर वेदना, सूज, ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी आणि दमल्यासारखं वाटत राहतं. मात्र नव्या साइट इफेक्टनुसार लसीकरणानंतर त्वचा लालसर होणे, शरीर दुखणं आणि उलटीसारखं वाटणं किंवा मळमळ होण्याची लक्षणं दिसत आहे.
कोरोनी लसीकरणाची सुरुवात तीन महिन्यांपूर्वी उत्तर अमेरिका, युरोप आणि इज्रायलसह काही देशांमध्ये झाली. यानंतर सामान्य लक्षणं पाहायला मिळाली. त्यानंतर नवे साइट इफेक्ट दिसण्याची शक्यता होती. मात्र नवीन साइड इफेक्टमध्ये खरंच चिंतेची बाब आहे? अमेरिकेच्या एजन्सीनुसार नव्या साइड इफेक्टमध्ये चिंता करण्याची गरज नाही. मानवी शरीरात लसीकरण केल्यानंतर साइड इफेक्ट दिसणं हे कोरोना व्हायरसविरोध लढाई करण्याचं काम सुरू केल्याचे संकेत असतात.
लसीकरणानंतर रोगप्रतिकारशक्तीत वाढ
लसीकरणानंतर शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं मानलं जातं. लसीकरणाचा पहिल डोज घेतल्यानंतर शरीरात Antibodies तयार होण्याची सुरुवात होते. दुसऱ्या डोजपर्यंत नीट काळजी घेतली तर बचाव होण्याची शक्यचा वाढीस लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona vaccination, President of america