'रेप नहीं प्यार था मिलॉर्ड..', मूकबधीर आरोपीची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता

'रेप नहीं प्यार था मिलॉर्ड..', मूकबधीर आरोपीची कोर्टाने केली निर्दोष मुक्तता

पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा आरोप असणाऱ्या मूकबधीर तरुणाची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. नेमकं काय होत प्रकरणी वाचा सविस्तर.

  • Share this:

मुंबई, 02 जानेवारी: (POCSO) पॉस्को कायद्याअंतर्गत मूकबधीर असणाऱ्या आरोपीची अखेर 4 वर्षांनी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. 2014 रोजी अपहरण आणि बलात्कार प्रकरणी मूकबधीर  तरुणाला तिरुपतीमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच कोर्टानं तरुणाची निर्दोश सुटका केली आहे. कोर्टाकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मूकबधीर  आहे. आरोपीने तरुणीवर बलात्कार केला नसून तरुणीने स्वत:च्या मर्जीनं तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आल्यानं कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे.

काय होतं प्रकरण

चार वर्षांपूर्वी मूकबधीर असलेल्या या तरुणाला तिरुपतीमधून अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी ताब्यात घेऊन कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी युवतीचं वय 15 वर्ष असल्यानं तरुणावर (POCSO)  पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. झालं असं होतं की 15 वर्षीय युवती या तरुणासोबत घरातून पळून गेली होती. मुलीच्या आई-वडिलांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाला अटक केली होती. घरातून पळून गेल्यानंतर युवती आणि तरुणानं तिरुपतीमध्ये छोटं घर घेतलं. तरुण मजुरी करून पोट भरत होता. 2015 रोजी मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून तरुणाला अटक करण्यात आली आणि ट्रायल कोर्टासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी मूकबधीर तरुणानं 'प्रेम करण्यासाठी कोणतीही शिक्षा दिली जाऊ नये ही माझी विनंती आहे. मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. मी लग्न केलं आहे.' अशी सांकेतिक भाषेत पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा-नवऱ्याशी वाद घालून ती आली होती मुंबईत, नोकरीचं आमिष दाखवून केला बलात्कार

कोर्टानंही अखेर तरुणाचं म्हणणं मानलं

तरुणाचा हेतू अपहरण करण्याचा नसून संसार करण्याचा होता. मुलीनं स्वत:हून तरुणासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. मुलगी अल्पवयीन आहे म्हणून हा गुन्हा तरुणानं केला असं फक्त एका पुराव्यावरून सादर करता येऊ शकत नाही. असं कोर्टानंही सांगितलं.

मुलीनं कोर्टात साक्ष देताना जरी सांगितलं असलं की तरुणानं माझ्यासोबत जबरदस्ती शरीरिक संबंध प्रस्थापित केले तरीही 2015 रोजी झालेल्या माजेस्ट्रेटमध्ये मुलीनं आपल्या पळून जाण्याची कबुली दिली होती. आपल्या मर्जीनं आणि प्रेम आहे म्हणून पळून गेल्याचं आणि मर्जीनं तरुणासोबत संबंध ठेवल्याचं 15 वर्षीय मुलीनं कबूल केलं होतं.

जर मुलीचं अपहरण करून जबरदस्ती करण्यात आली असती तर तिरुपतीला ते जिथे राहतात तिथून मुलीनं एकदाही पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. अथवा इतरांची कोणतीही मदतही घेतली नाही. त्यामुळे मुलीचं अपहरण केल्याचा प्रकार म्हणता येणार नाही असंही कोर्टाकडून सांगण्यात आलं.

मेडिकल रिपोर्ट काय सांगतो

दरम्यान कोर्टात सादर केलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार अल्पवयीन मुलीनं आपल्या मर्जीनं तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे मेडिकल रिपोर्टमधूनही त्यांचं एकमेकांवर प्रेम असल्यानं त्यांनी शरीरिक संबंध ठेवल्याचं समोर आलं.

कोर्टानं सर्व तपशिल आणि अहवाल पाहून मुकबधीर तरुणाला दोषमुक्त केलं आहे. दरम्यान तरुणाला बोलता आणि ऐकता येत नसल्यानं सांकेतिक भाषेचा वापर करून ही केस चालवण्यात आली होती. यासाठी विशेष शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती.

हेही वाचा-मुंबईत अल्पवयीन मुलीला अश्लील VIDEO दाखवून छेडछाड, तरुणाला अटक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2020 04:03 AM IST

ताज्या बातम्या