मुंबई, 01 जानेवारी: महाराष्ट्रीची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हातावर पोट असणाऱ्या तरुणीवर नोकरीचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान बलात्कार करणाऱ्या 60 वर्षीय नराधमाला पोलिसांनी वांद्रा इथल्या परिसरातून राहत्या घरातून अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 60 वर्षीय आरोपी सलीम जावेरी वांद्र्यातील आपल्या घरी पीडित महिलेवर 15 दिवसांपासून बलात्कार करत होता. पीडितेच्या शरीरातून रक्त येण्यास सुरुवात झाल्यानंतर सलीमने भाभा रुग्णालयात पीडितेला उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी हा सगळ्या प्रकार उघड झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नराधमाला सोमवारी रात्री उशिरा वांद्रा इथल्या परिसरातून अटक करण्यात आली आहे.
पीडित महिला उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. आपल्या पतीसोबत भांडून तिने घर सोडलं आणि मुंबई गाठली. मुंबईमध्ये छोटी-मोठी कामं करून पैसे मिळवण्याचं तिचं स्वप्न होतं. एक दिवस बस स्टॉपवर पीडित महिला उभी असताना 60 वर्षीय आरोपीने तिला नोकरी देण्याचं आमिष दाखवलं. स्वयंपाक आणि काम करण्याची नोकरी देतो असं सांगून त्याने स्वत:च्या घरी नेलं. तिथे गेल्यानंतर नराधमाने तिला डांबून तिच्यावर 15 दिवस बलात्कार करत राहिला.
हेही वाचा-स्पामध्ये सुरू होतं SEX रॅकेट, 'हॅपी एंडिंग' कोडवर्ड वापरला तर मिळतात या ऑफर
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेला मुंबईची कोणतीही माहिती नव्हती. तिला इथली भाषा समजण्यामध्येही अनेक समस्या येत असल्यानं बोलण्यात अडथळे येत आहेत. जखमी महिलेवर सध्या वांद्रा इथल्या भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचा फायदा घेऊन आरोपीने महिलेला नोकरीचं आमिष दाखवलं आणि बलात्कार केला.
बांद्रा इथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयलक्ष्मी हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण घटनेची माहिती भाभा रुग्णालयातून मिळाली. 60 वर्षीय आरोपी सलीम जावेरीची पत्नी त्याला 20 वर्षांपूर्वीच सोडून अमेरिकेला गेली. त्यामुळे सलीम जावेरी इथे वांद्रात एकटाच रहात होता. आरोपीविरोधात पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हा अंतर्गत सोमवारी रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे.
हेही वाचा-मुंबईत अल्पवयीन मुलीला अश्लील VIDEO दाखवून छेडछाड, तरुणाला अटक
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.