मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आतापर्यंत 30 जणांचा बळी, आज 103 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आतापर्यंत 30 जणांचा बळी, आज 103 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे

  • Share this:

मुंबई, 5 एप्रिल : देशभरात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात मुंबईत कोरोनाचा (Mumbai Covid -19) सर्वाधित धोका असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मुंबईत 30 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मुंबई शहराची इतर राज्यांशी तुलना केल्यास ही संख्या खूप जास्त आहे. सध्या मुंबईत एकूण 433 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या तीन दिवसात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची तपासणी केली जात आहे. मृत्यू झालेल्यांमधील 6 जणांना दीर्घकालीन आजार होता. तर यापैकी 2 जणं वृद्ध होते. आज मृत्यू झालेल्यांमध्ये 7 जण हे पुरुष असून 1 महिला होती. यांचे वय 50 ते 80 या दरम्यान असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

संबंधित - 'एकदम लॉकडाऊन संपणार नाही, तर...', अखेर आरोग्यमंत्र्यांनीच केलं स्पष्ट

सध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3000 च्या पार गेला असून 75 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे. काल आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. धारावी या भागात तब्बल 7 ते 8 लाख नागरिक राहतात. त्यामुळे अशा ठिकाणी कोरोनाचा फैलाव जलद गतीने होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाने 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याचं सांगितले असले तरी रुग्णांची संख्या कमी न झाल्यास ही मर्यादा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील निजामुद्दीन जमात या कार्यक्रमातील अनेक सदस्यांनी मुंबईतील धारावीत वास्तव्य केल्याचे समोर आल्यानंतर भीती वाढली आहे.

संबंधित - धक्कादायक! तबलिगीसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाची गोळी घालून हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2020 06:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading