Home /News /national /

एकाच शहरात दोन पत्नींसोबत राहत होता तरुण, पहिल्या पत्नीच्या संशयानंतर अशी झाली पोलखोल

एकाच शहरात दोन पत्नींसोबत राहत होता तरुण, पहिल्या पत्नीच्या संशयानंतर अशी झाली पोलखोल

एका तरुणानं दोन लग्न (Marriages) केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणानं आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नाही आहे.

    हरियाणा, 06 जानेवारी: हरियाणातील सोनीपत (Sonipat) जिल्ह्यात एका तरुणानं दोन लग्न (Marriages) केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या तरुणानं आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला नाही आहे. हा तरुण त्याच्या दोन पत्नींसह वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होता. तो वेळ काढून दोघींकडे जायचा. मात्र त्याच्या दोन्ही पत्नींना या जराही भनक नव्हती. ही बाब त्याने पहिल्या पत्नीलाही (Wife) कळू दिली नाही. त्याला दोन्ही पत्नींपासून मुलेही आहेत. मात्र पहिल्या पत्नीनं त्याला पकडल्यानंतर आता आरोपी पती जीवे मारण्याची धमकी देत ​​आहे. याप्रकरणी पीडितेनं पोलिसांत (Police) तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, पीडिता मुरथळ येथील एका सोसायटीत राहते. तिने 2004 मध्ये रवींद्र मान याच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे. बरेच दिवस दोघंही मुलीसोबत सुखाने राहत होते. मात्र काही दिवसांपासून पीडितेनं सांगितले की, तिच्या पतीने तिला वेळ देणं बंद केलं होतं. तो कामाच्या बहाण्याने घराबाहेर पडत असे. तिला संशय आल्यावर ती एके दिवशी तिच्या पतीच्या मागे गेली. तिनं त्याचा पाठलाग केला. पाठलाग करताना ती सेक्टर-23 मध्ये पोहोचली, तिथे तिचा पती आणि दुसरी महिला आढळून आली. पहिल्या पत्नीला धमकी त्याने याबाबत चौकशी केली असता ती त्याची दुसरी पत्नी असल्याचे समोर आले. जिच्यापासून त्याला दोन मुले आहेत. जे शहरातील खासगी शाळेत शिकतात. मुलाच्या वडिलांचे नाव रवींद्र असे लिहिल्याची माहिती शाळेकडून मिळाली. या संदर्भात तिने पती रवींद्र यांच्याशी बोलले असता त्यानं टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याचे ठोस पुरावे समोर ठेवताच तो तिला धमक्या देऊ लागला. पीडितेनं केले आरोप तिच्या पतीला माझी आणि मुलीची हत्या करायची असल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षकांना देण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून मुरथळ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवकरच आरोपीला अटक करून पुढील कारवाई केली जाईल.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Haryana

    पुढील बातम्या