• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • नाना पटोलेंनंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाई जगतापांची भूमिका स्पष्ट

नाना पटोलेंनंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाई जगतापांची भूमिका स्पष्ट

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोले यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसमधून वेगळा स्वबळाचा सूर बळावलेला दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 जून: महाराष्ट्र राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी (Maha vikas aghadi)सरकार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) स्वबळावर लढण्याची भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं नाना पटोले यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेसमधून वेगळा स्वबळाचा सूर बळावलेला दिसत आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Congress Bhai Jagtap)यांनीही स्वबळाचा नारा दिला आहे. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाई जगताप बोलत होते. यावेळी ते बोलले की, स्वबळावर लढू देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. तसंच आम्हाला स्वबळावर लढू द्या असा आग्रहही त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केला आहे. यावेळी भाई जगताप यांनी आम्हाला एकट्याला लढू द्या, देखते है किसमे कितना है दम असं आव्हानंही दिलं आहे. हेही वाचा- आगामी विधानसभा निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया माझी तुमच्याकडे विनंती आहे. राहुल गांधींना विनंती आहे. सोनिया गांधींना विनंती आहे. आम्हाला एकटं लढू द्या. तेव्हा बघुयात किस मे है कितना दम, असं भाई जगताप म्हणाले आहेत.  हा संदेश राज्यातल्या प्रभारींनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे पोहचवावा अशी विनंतीही त्यांनी केली. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पंतप्रधान करायचंच असा निश्चय काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे. यानिमित्तानं मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. काँग्रेस पक्षाला तिसरा पक्ष म्हटलं जातं अशी खंतही यावेळी भाई जगताप यांनी बोलून दाखवली.
  Published by:Pooja Vichare
  First published: