• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • शिवसेना-काँग्रेसनंतर आगामी विधानसभा निवडणुकीवर NCPची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना-काँग्रेसनंतर आगामी विधानसभा निवडणुकीवर NCPची पहिली प्रतिक्रिया

Assembly elections 2024: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) स्वबळावर लढण्याची भूमिका घेताना दिसत आहे.

 • Share this:
  नागपूर, 19 जून: महाराष्ट्र राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडी (Maha vikas aghadi)सरकार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसनं आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) स्वबळावर लढण्याची भूमिका घेताना दिसत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि नाना पटोले यांना फटकारलं आहे. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना युती झाली तर चमत्कार होईल असे मत मांडले असले तरी हे शिवसेनेसोबत जायचं की काय करायचे हे 2023 मध्ये ठरवले जाईल. तेव्हाची परिस्थिती काय असेल त्यानुसार तेव्हा युती आघाडीचा निर्णय तेव्हा घेतला जाईल, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा- शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा तुफान राडा, कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर लोकशाहीत सर्वांना तो अधिकार असल्याचंही प्रफुल्ल पटेल म्हणालेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणासोबत युती आघाडी करायची याबद्दल अजून काहीच ठरले नाही. स्थानिक स्तरावर याबद्दल निर्णय घेतले जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे. इतकंच काय तर काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वतंत्र लढण्याची भाषा असेल तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: