किन्नौर, 12 ऑगस्ट: हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh News) किन्नौर (Kinnaur Landslide)येथे पुन्हा एकदा दरड कोसळली. या दुर्घटनेत बस ढिगाऱ्याखाली दबली गेली. समोर आलेल्या माहितीनुसार, बस अजूनही ढिगाऱ्याखाली (Debris)अडकली आहे. बचाव दलाकडून मदत कार्य आणि रेस्क्यू ऑपरेशन (Rescue Team) सुरु आहे. आतापर्यंत 13 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलेत.
दरम्यान 13 लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. यातले 10 मृतदेह बुधवारी बाहेर काढण्यात आलेत. एक बस, बोलेरो आणि त्यातील प्रवाशांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. काल रात्री अंधार पडल्यानं रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात आलं होतं. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे.
Himachal Pradesh | Another body has been recovered by Indo-Tibetan Border Police (ITBP) personnel from the wreckage of a bus following the landslide in Kinnaur. Death toll rises to 11.
(Pic credits: ITBP) pic.twitter.com/cm3As2GiMg — ANI (@ANI) August 12, 2021
पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांचे नातेवाईक आणि जखमींसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयानं ट्वीट करुन माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.
Another dead body retrieved from the spot. Total 5 dead bodies have been retrieved till now. Rescue mission is on.#kinnaurlandslide #Kinnaur #ITBP pic.twitter.com/zqwL8cTRFd
— ITBP (@ITBP_official) August 11, 2021
मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी म्हटलं की, काही लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. सतत दगड पडत असल्यानं रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री जयराम ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ शिमलाहून जवळपास 200 किमी लांब आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Himachal pradesh, Shimla