मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत सापडलेल्या स्फोटकांविषयी ATS चा मोठा खुलासा; काय होता उद्देश?

मुंबईत सापडलेल्या स्फोटकांविषयी ATS चा मोठा खुलासा; काय होता उद्देश?

ही बेवारस गाडी पेडर रोड परिसरातल्या रस्त्यावर तब्बल 18 तास उभी होती, असं आता स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या या हाय प्रोफाइल भागात अनेक प्रतिष्ठितांचे, राजकारण्यांचे बंगले आहेत. ATS च्या प्राथमिक तपासात काय स्पष्ट झालं वाचा..

ही बेवारस गाडी पेडर रोड परिसरातल्या रस्त्यावर तब्बल 18 तास उभी होती, असं आता स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या या हाय प्रोफाइल भागात अनेक प्रतिष्ठितांचे, राजकारण्यांचे बंगले आहेत. ATS च्या प्राथमिक तपासात काय स्पष्ट झालं वाचा..

ही बेवारस गाडी पेडर रोड परिसरातल्या रस्त्यावर तब्बल 18 तास उभी होती, असं आता स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या या हाय प्रोफाइल भागात अनेक प्रतिष्ठितांचे, राजकारण्यांचे बंगले आहेत. ATS च्या प्राथमिक तपासात काय स्पष्ट झालं वाचा..

  मुंबई, 25 फेब्रुवारी: मुंबईच्या (Bomb scare mumbai) पेडर रोड (Peddar Road) परिसरात एका रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्यानं (Gelatin explosives in Mumbai ) खळबळ उडाली आहे. ही बेवारस गाडी या परिसरात तब्बल 18 तास उभी होती, असं आता स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या या हाय प्रोफाइल भागात अनेक प्रतिष्ठितांचे बंगले, राजकीय व्यक्तींची ये-ज, दूतावास कार्यालयं  आहेत आणि तिथेच स्फोटकांची गाडी सापडल्याने अधिकच चिंतेचा विषय आहे. याबाबतचा तपास करायला महाराष्ट्र दहशतवाद निर्मूलन पथकाचे (ATS) लोक  घटनास्थळी पोहोचले होते. आता ATS च्या उच्चपदस्थ सूत्रांकडून News18 ला स्फोटकांबाबत मोठी माहिती मिळाली आहे.

  महाराष्ट्रातल्या तपासयंत्रणांच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या या सुट्या होत्या. बाँबस्फोट घडवण्यासाठी त्या एकत्र बांधून असेम्बल कराव्या लागतात. मुंबईत सापडलेली स्फोटकं असेम्बल्ड नव्हती, असं तपास यंत्रणांनी सांगितलं. "आम्ही या प्रकरणी सर्व दिशांनी तपास करत आहोत. पण स्फोटकांची अवस्था पाहता त्यातून बाँबस्फोट घडवायच्या उद्देशापेक्षा दहशत पसरवण्याचा उद्देश असावा, असं वाटतं", असं सूत्रांचं म्हणणं आहे. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी याचा काही संबंध नाही ना हेसुद्धा तपासलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

  मुंबईच्या महत्त्वाच्या रस्त्यावर जिलेटिन स्फोटकं; काय घडलं? समजून घ्या 10 पॉइंटर

  तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, हा परिसर हाय सिक्युरिटी झोनमध्ये येतो. ही स्फोटकं इथे ठेवणाऱ्या व्यक्तीला किंवा संघटनेला याची निश्चित जाणीव असावी. त्यामुळे मुद्दामच भीती किंवा दहशत पसरवण्यासाठी ही स्फोटकांची गाडी इथे ठेवण्यात आली असावी, असं प्रथमदर्शनी वाटतं. बाँबस्फोट घटवण्यापेक्षा त्याची भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही गाडी कारमायकल रोडवर लावण्यात आली असावी, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.

  ही गाडी रस्त्यावर ठेवण्यापूर्वी कुणी इथे येऊ परिसराची रेकी केली होती का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

  CCTV मध्ये काय दिसलं?

  हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटिनच्या कांड्या आढळल्या.  रात्री 1 वाजताच कुणीतरी ही गाडी इथे लावून पसार झालं होतं. परिसरातल्या CCTV चं फूटेज आणि गाडीची नंबर प्लेट यावरून तपास यंत्रणांचा प्रवास सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एकच्या सुमारास या मायकल रोडवर हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी पार्क करण्यात आली होती. गाडी पार्क केल्यानंतर गाडीतील व्यक्ती खाली उतरून मागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून बसून निघून जातो, असं CCTV मध्ये दिसलं आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांनी जारी केल आहे.

  First published:
  top videos

   Tags: Explosives, Mumbai