मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईच्या महत्त्वाच्या रस्त्यावर जिलेटिन स्फोटकं; काय घडलं, कुणी ठेवली 10 पॉइंटरच्या आधारे समजून घ्या

मुंबईच्या महत्त्वाच्या रस्त्यावर जिलेटिन स्फोटकं; काय घडलं, कुणी ठेवली 10 पॉइंटरच्या आधारे समजून घ्या

मुंबईत स्फोटकं: बाँब शोधक पथकाने काळजीपूर्वक तपासणी केली असता या बेवारस गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या आढळल्या.

मुंबईत स्फोटकं: बाँब शोधक पथकाने काळजीपूर्वक तपासणी केली असता या बेवारस गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या आढळल्या.

मुंबईत स्फोटकं: बाँब शोधक पथकाने काळजीपूर्वक तपासणी केली असता या बेवारस गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या आढळल्या.

  मुंबई, 25 फेब्रुवारी: मुंबईच्या पेडर रोडजवळच्या ऐन मोक्याच्या रस्त्यावर (carmichael road) गुरुवारी संध्याकाळी अचानक वाहतूक थांबवण्यात आली. रस्ता मोकळा झाला, पोलिसांची फौज जमली आणि बाँबशोधक आणि नाशक पथकही पोहोचलं. थोड्याच वेळात एका बेवारस स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं (Gelatin explosives found in Mumabi) असल्याचा उलगडा झाला आणि मुंबई थोडक्यात वाचल्याची जाणीव झाली. नेमकं काय घडलं? कसं उलगडलं?

  1.मुंबईच्या पेडर रोड परिसरातल्या मायकल रोडवर एक गाडी दुपारपासून नो पार्किंगमध्ये उभी असलेली दिसली.

  2. ट्रॅफिक पोलिसांनी दुपारी 1 वाजता या स्कॉर्पिओ गाडीला जॅमरही लावला.

  3. या महत्त्वाच्या रोडवर आणि परिसरांत अनेक प्रतिष्ठित व्यक्ती राहतात. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई मनपा आयुक्त बंगला, जेएनपीटी आयुक्त बंगला, आरबीआय गव्हर्नर बंगला व्हीव्हीआयपी बंगला आहेत. जपानी दूतावासही जवळच आहे.

  4. गाडीला जॅमर लावूनही बराच काळ कुणी आलं नाही. स्थानिकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवलं.

  5. संध्याकाळी 6 वाजायच्या सुमारास पोलिसांना संशय आल्याने बाॅम्ब शोधक पथकाला बोलावलं गेलं. परिसर रिकामा करायला सुरुवात केली.

  6. बाँब शोधक पथकाने काळजीपूर्वक तपासणी केली असता यात जिलेटिनच्या 20 कांड्या आढळल्या.

  7. ही स्फोटकं निकामी करून तातडीने ATS ला (महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक)  पाचारण करण्यात आलं.

  8. मुंबई क्राइम ब्रँच आणि ATS ने गाडीची कसून चौकशी केली. CCTV फूटेजमधून या गाडीबद्दल धागेदोरे सापडू शकतील, असा पोलिसांचा कयास आहे.

  9. गाडी सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहे. आता पोलीस पुढचा तपास करत आहे. गाडीच्या नंबर प्लेटवरून मालकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

  10. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. 'मुंबईत एका स्कॉर्पिओ व्हॅनमध्ये जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्या आहेत. या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई क्राइम ब्रँच करते आहे. लवकरात लवकर सत्य समोर येईल, असं त्याचंं म्हणणं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Breaking News, Mumbai