जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai: महापौर अ‍ॅक्शन मोडमध्ये; गेट वे ऑफ इंडिया परिसरात पाहणी दौरा, मास्क न घालणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांनी झापलं

Mumbai: महापौर अ‍ॅक्शन मोडमध्ये; गेट वे ऑफ इंडिया परिसरात पाहणी दौरा, मास्क न घालणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांनी झापलं

Mumbai: महापौर अ‍ॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांनी झापलं (Photo: Twitter)

Mumbai: महापौर अ‍ॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालणाऱ्यांना किशोरी पेडणेकरांनी झापलं (Photo: Twitter)

Mumbai Mayor kishori pednekar is in action mode: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

तुषार रूपनवर, प्रतिनिधी मुंबई, 9 जानेवारी : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना (Corona) बाधितांच्या आकडेवारी दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक नोंद होताना दिसत आहे. वाढत्या कोरनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलण्यात येत असून आता राज्यात निर्बंध लागू (restrictions imposed in Maharashtra) करण्यात आले आहेत. नवे निर्बंध 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. त्यात दरम्यान मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ऑफ इंडिया परिसरातील पाहणी करण्यासाठी अचानक भेट दिली.

जाहिरात

नियम मोडणाऱ्यांना महापौरांनी कडक शब्दांत दिली समज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेट वे ॲाफ इंडिया परिसरात पाहणी केली. पाहणी करत असताना ज्यांनी मास्क घातला नाही त्यांना मास्क घालण्यासंदर्भात महापौरांनी सूचना देखील दिल्या. नियम मोडणाऱ्यांना महापौर किशोरी पेडणेकर यांनी कडक शब्दांत समज दिली. तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहनही यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, कोस्टल रोड संदर्भात येत्या दोन दिवसात स्पष्टपणे चित्र दिसेल. आता एवढ्यात मी बोलणार नाही. विरोधक आणखी 25 वर्षे विरोधी पक्षात बसतील. त्यांना फक्त विरोध करणे हे एकच काम आहे.

मी गेट वे परिसरात येऊन पाहणी केली. कारण आता संचारबंदी लागू होणार आहे. जनतेने मास्क घालन गरजेच आहे अशा सूचना देखील दिल्या. सर्वांनी नियंमांच पालन करावं. मुख्यमंत्री सर्वांच हित लक्षात घेऊन निर्णय घेत आहे असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मजदूर यांच्या मनात जाणीवपूर्वक भ्रम तयार केला जातोय. लॉककडाऊन लावण्याच्या संदर्भात हा भ्रण निर्माण केला जात आहे. मात्र अशा अफवांवर बिलकुल विश्वास ठेऊ नका. कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र लॅाकडाऊन नाही असंही महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. राज्यात कठोर निर्बंध कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बंध लागू (Restrictions imposed in Maharashtra) केले आहेत. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री 10 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. हे निर्बंध आणि नियम 10 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 4.30 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांसह काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात