मुंबई, 13 ऑक्टोबर : जळीतकांडाने मुंबईत (Mumbai) खळबळ उडाली आहे. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 25 ते 30 दुचाकींनी अचानक पेट घेतला. मुंबईतील कुर्ला पूर्व (Kurla east) परिसरातील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या इमारतीखाली उभ्या असलेल्या या दुचाकींना आग (bikes set on fire) लागली. ही आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा, लोट हे इमारतीच्या आठव्या मजल्यापर्यंत पोहोचत होते. गाड्यांनी पेट घेतल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. हे व्हिडीओ पाहून आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला येईल. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
— News18Lokmat (@News18lokmat) October 13, 2021
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या आगीत सर्वच्या सर्व दुचाकी या जळुन खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीतहानी झालेली नाहीये. ही आग कुणी लावली की लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. जळत्या सिगारेटचं थोटुक फेकल्यामुळे भाग भडकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 2019 मध्ये दादर परिसरात जळीतकांड मे 2019 मध्ये दादर इथे शिवाजी पार्क परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 5 दुचाकी मध्यरात्री 1च्या सुमारास जळून खाक झाल्या. या घटनेनं परिसरात एकाच खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी ही आग विझवली असून, त्यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे या आधी काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी 2 दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला होता. घटनेबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 मध्ये 18 दुचाकींना आग डिसेंबर 2018 मध्ये सुद्धा मुंबईत अशाच प्रकारे जळीतकांड घडलं होतं. डिसेंबर 2018 मध्ये सायन इथल्या श्री सुंदर कमलानगरमध्ये अज्ञातांनी दुचाकी जाळल्या. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास 17 ते 18 दुचाकी वाहनं जाळण्यात आली. या दुचाकी कोणी जाळल्या, दुचाकी जळण्याचं नेमकं काय कारण हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं. मालकाने दिला नाही पगार, पुण्यात नोकराने दुचाकी जाळली आठ दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड येथे ही घटना घडली आहे. कोरोनामुळे अनेक उद्योग धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कामगारांच्या पगाराचेही वांदे झाले होते. पण आता कोरोनातून सावरल्यानंतर उद्योग धंदे सुरू झाले आहे पण अजूनही मालकांकडून पैसे काही निघत नाही. त्यामुळेच पिंपरी चिंचवडमध्ये एका कामगाराने पगार न दिल्यामुळे मालकाची दुचाकीच भर रस्त्यावर पेटवून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. अंकित शिशुपाल यादव असं दुचाकी पेटवून देणाऱ्या कामगाराचं नाव आहे. अंकित यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो मांजरी येथे गणेश उंदरे पाटील यांच्याकडे कामाला होता. मात्र गणेश पाटील यांनी अंकित यादव याला पगार दिला नाही. त्याने पाटील यांच्याकडे पगाराची मागणी केली. पण, त्यांनी काही पगार दिलाच नाही. महिनाभर काम केल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे अंकितला राग अनावर झाला. त्याने थेट मालकाची दुचाकीच पळवून आणली. त्यानंतर गाडी चिंचवड येथील प्रदीप स्वीटच्या समोर पेटवून दिली आहे.