Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई विमानतळावर प्रवाशांची होणारी फसवणूक थांबणार; RTO ने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई विमानतळावर प्रवाशांची होणारी फसवणूक थांबणार; RTO ने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Mumbai : मुंबई विमानतळाहून नवी मुंबई, ठाण्यात प्रवास करणाऱ्यांची लूट आता थांबणार आहे. (Prepaid autos to Thane and Navi Mumbai from the airport soon) मनमानी भाडं आकारणाऱ्या रिक्षा, टॅक्सीचालकांना चाप बसवण्यासाठी RTO ने मोठा निर्णय घेतला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 डिसेंबर: रात्री अपरात्री विमानतळावर (Airport) किंवा रेल्वे स्थानकावर (Railway Station) उतरल्यानंतर प्रवाशांना (Passengers) आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागतो. रात्री सार्वजनिक वाहने (Public transportation) बंद असल्यामुळे ऑटो किंवा टॅक्सी ड्रायव्हर (Auto and taxi Driver) प्रवाशांकडून जास्तीचे पैसे उकळतात. तसेच प्रवाशांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यानं ऑटो ड्रायव्हर सांगतील तेवढे पैसे द्यावे लागतात. यामध्ये त्यांची अनेकदा आर्थिक फसवणूक (Fraud) होते. हा प्रकार आपल्याला सऱ्हासपणे पुणे (Pune) आणि मुंबई (Mumbai) यांसारख्या महानगराच्या ठिकाणी पाहायला मिळतो. पण आता मुबंई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची होणारी ही आर्थिक लुट थांबणार आहे. कारण RTO प्रशासनाने आता यासंबधी कडक पावलं उचलली आहेत. त्यामुळे बेकायदेशीर शुल्क आकरणाऱ्या रिक्षा चालकांना चाप बसणार आहे.

याबात RTO ने अशी माहिती दिली की, मुंबई शहर विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी आता T2 विमानतळावरून थेट मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईला जाण्यासाठी आता त्वरित रिक्षा मिळतील. ही सेवा 2021 वर्षाच्या सुरुवातीपासून सुरु होणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी दिली. "यामुळं बेकायदेशीर वाहन चालकांचा प्रश्न मिटणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांनी आपल्याच वाहनातून प्रवास करावा, यासाठी प्रवाशांच्या पळवापळवीच्या घटना देखील कमी होणार आहेत." प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देखील हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी पुढं सांगितलं की, सध्याच्या नियमांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत. तसेच सुरुवातीला रिक्षा भाडं देण्याची पद्धतही तशीच राहिल. त्याचबरोबर “बुकिंगच्या वेळी प्रवाशांकडून पैसे स्विकारण्याची यंत्रणा आमच्याकडे आहे. तसेच आम्ही विमानतळ अधिकाऱ्यांनाही कॅशलेस पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

एकंदरीतच रात्रीच्या वेळी किंवा दिवसा विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांचा त्रास आता कमी होणार आहे. त्याचबरोबर आगाऊ भाडे आकरणाऱ्या रिक्षा चालकांना आणि बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकांनाही चाप बसणार आहे.

First published:

Tags: Mumbai, Prepaid, RTO