Home /News /mumbai /

#Mumbai26/11:'कसाबने हल्ला केला तेव्हा मी त्याच गाडीत होतो'

#Mumbai26/11:'कसाबने हल्ला केला तेव्हा मी त्याच गाडीत होतो'

त्यांनी एके-४७ ने गाडीची अक्षरश: चाळण केली होती. विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे शहीद झाले. ते गाडीजवळ आले आणि दरवाजा उघडला आणि समोर बसलेले साळस्कर आणि कामटे यांना बाहेर फेकलं.

२६ नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याला १० वर्षं पूर्ण होत आहे. या हल्ल्यात १६४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांचे कर्तबगार अधिकारी विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे या हल्ल्यात शहीद झाले होते. तुकाराम ओंबाळे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. ज्या अजमल कसाबने विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता त्यावेळी त्यांच्यासोबत होते मुंबई पोलीस दलातील अधिकारी अरुण जाधव... आज या हल्ल्याला १० वर्ष झाली. अरुण जाधव यांच्याशी आम्ही बोलतो तेव्हा त्यांनी घडलेली हकीकत अंगावर शहारे आणणारी होती. जेव्हा अजमल कसाब आणि त्याचा सहकारी इस्माईल सीएसटी स्टेशनमध्ये अंदाधुंद गोळीबार करून बाहेर पडले होते. काही तरी घातपात घडला याची माहिती मिळाल्यानंतर विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे हे रंगभवन लेनकडे निघाले होते. तेव्हा कसाब आणि इस्माईल कामा हाॅस्पिटलच्या समोरून गेले होते. साळस्कर स्वत: पोलिसांची क्वालिस गाडी चालवत होते. कामटे त्यांच्या बाजूला बसले होते. तर करकरे हे मागील सीटवर बसले होते. तर मागच्या सीटवर ड्रायव्हर, क्राईम ब्रांचचे अरुण जाधव आणि तीन पोलीस काॅन्स्टेबल बसलेले होते. जाधव यांनी मागच्या सीटवरुन दोघे जण समोर येताना पाहिले, जशी गाडी त्यांच्याजवळ काही अंतरावर होती तेव्हा कसाब आणि इस्माईलने गाडीवर तुफान गोळीबार केला. हा हल्ला खूप भीषण होता. त्यांनी एके-४७ ने गाडीची अक्षरश: चाळण केली होती. विजय साळस्कर, अशोक कामटे आणि हेमंत करकरे शहीद झाले. ते गाडीजवळ आले आणि दरवाजा उघडला आणि समोर बसलेले साळस्कर आणि कामटे यांना बाहेर फेकलं. कसाब समोरच्या सीटवर जाऊन बसला. तर इस्माईल गाडी चालवत होता. गाडी काही अंतर दूर गेल्यानंतर पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाल्यामुळे ते दोघे खाली उतरले. त्यानंतर ते एक स्कोडा कार घेऊन पुढे गेले. मागे बसलेले जाधव हे जखमी झाले होते. समोर बसलेले काॅन्स्टेबल शहीद झाले होते. जाधव हे जखमी अवस्थेत निपचीप पडून होते. गाडी पंक्चर झाल्यामुळे दोघे उतरून निघून गेले त्यामुळे काॅन्स्टेबल अरुण जाधव बचावले होते. अरुण जाधव म्हणतात, "ज्यावेळी ती परिस्थिती समोर आली तिला आम्ही सामोरं गेलो आणि साडेतीन तासात एक जिवंत दहशतवादी पकडू शकलो ही मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कामगिरी होती. पण, याची आम्हाला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळस्कर हे अधिकारी शहीद झाले त्यांची उणीवा जाणावते. त्यांची जागा कुणीच भरू शकणार नाही. मुंबईसाठी ही खूप मोठी हानी आहे." "त्यावेळी सुरक्षाव्यवस्थेत आमच्याकडे अत्याधुनिक हत्यारं नव्हती. आता आमच्याकडे फोर्सवन आहे. अत्याधुनिक हत्यारं आहे. उद्या अशी परिस्थिती येऊ नये पण जर आलीच तर आम्ही सज्ज आहोत." 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील आणखी काही कहाण्या याच मालिकेच्या पुढील भागात...
First published:

Tags: Mumbai, Vijay salaskar, मुंबई पोलीस

पुढील बातम्या