जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / जिद्दीला वय नसतं! 102 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवलं, 15 दिवसांत मिळवला डिस्चार्ज

जिद्दीला वय नसतं! 102 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवलं, 15 दिवसांत मिळवला डिस्चार्ज

जिद्दीला वय नसतं! 102 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवलं, 15 दिवसांत मिळवला डिस्चार्ज

‘तुम्ही या कोरोनाला घाबरलात तर कोणत्याही उपचारांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही त्यामुळे कोरोनाला घाबरू नका कोरोनाशी दोन हात करा’, असा संदेश या आजींनी दिला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 30 एप्रिल: राज्यात सध्या सर्वत्र कोरोना या वैश्विक महामारीमुळे (Coronavirus Pandemic) अनेकांचे जीव गेले आहेत. कोरोनच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave of COVID-19) अगदी वीस वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना कोरोनानं गाठलं आहे, यामुळे अनेकांच्या मनात भीती वाढली आहे. मात्र, ‘ही भीती कोरोनावर तुम्हाला मात करू देणार नाही. तुम्ही या कोरोनाला घाबरलात तर कोणत्याही उपचारांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही त्यामुळे कोरोनाला घाबरू नका कोरोनाशी दोन हात करा. तुम्ही कोरोनावर नक्की मात कराल आणि बरे व्हाल’,असा संदेश चक्क 102 वर्षांच्या आजींनी दिला आहे. आजींना डिस्चार्ज देताना हॉस्पिटलमधील नर्स, डॉक्टर, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी केक कापून आजींचं अभिनंदन केलं आणि आनंदाने त्यांना घरी पाठवलं. (India Fights Corona) ठाण्यातील होरायझन प्राईम या हॉस्पिटलमध्ये गेले पंधरा दिवस उपचार घेऊन सुशीला पाठक नावाच्या एकशे दोन वर्षांच्या आजींनी (102 Year Old Lady Defeated Coronavirus) कोरोनावर मात केली असून त्यांनी अतिशय खंबीरपणे कोरोनाचा सामना केला आहे. गेले पंधरा दिवस मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या श्रीमती सुशीला पाठक या आजींवर ठाण्यातील होरायझन प्राईम या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वय 102 वर्ष आणि कोरोनाची लागण झाल्यामुळे आजींचे नेमके पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण आजींचे दोन्ही नातू डॉक्टर सुजित बोपर्डेकर आणि डॉक्टर अभिजीत बोपर्डेकर यांनी आजींची इच्छाशक्ती पाहिली आणि आजी कोरोनावर सहज मात करतील हे दोघांच्या लक्षात आल.  त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या आजीवर उपचार करण्याची पूर्ण मुभा दिली. परिणामी पंधरा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर होरायझन प्राईम या कोव्हिड सेंटरमधील डॉक्टरांनी आजींना कोरोनापासून मुक्त करण्यात मोलाचं सहकार्य केलं.

News18

एवढंच नाही तर उपचारादरम्यान देखील आजींनी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचं पालन केलं होते. तसंच आपल्याला कोरोना झाला आहे म्हणजे आपल्याला काहीतरी भयंकर झालंय असा निगेटिव्ह विचार या आजींनी कधीच केला नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अगदी सकारात्मकतेने आजींनी पंधरा दिवस कोरोनाचा सामना केला आणि कोरोनावर मात करून आजी त्यांच्या घरी सुखरूप परतल्या. आजींनी एक प्रकारे आम्हाला देखील सकारात्मकतेचा धडा दिला आहे असं मत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी व्यक्त केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात