मुंबई, 9 जानेवारी: अमेरिकेमध्ये प्रतिष्ठित स्टोक पार्क विकत घेतल्यानंतर अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani )यांच्या रिलायन्सने (Reliance) न्यूयॉर्कमध्ये 729 कोटीचे लग्झरी हॉटेल खरेदी केले आहे. रिलायन्सने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत दुसरे मोठे हॉटेल विकत घेतले आहे.
मँडरिन ओरिएंटल न्यूयॉर्क, न्यूयॉर्क शहरातील प्रीमियम लग्झरी हॉटेल्सपैकी एक, 2003 मध्ये 80 कोलंबस सर्कल येथे, सुंदर सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलजवळ हे हॉटेल उघडण्यात आले.
हे जगभरात प्रसिद्ध असून या हॉटेलला अनेक प्रतिष्ठित सन्मान मिळाले आहेत, ज्यात AAA फाइव्ह डायमंड अवॉर्ड, फोर्ब्स फाईव्ह स्टार हॉटेल आणि फोर्ब्स फाईव्ह स्टार स्पा यांचा समावेश आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने, कोलंबस सेंटर कॉर्पोरेशन (Cayman) चे संपूर्ण जारी केलेले भाग भांडवल, केमन आयलंडमध्ये समाविष्ट केलेली कंपनी आणि मँडरीन ओरिएंटल न्यूयॉर्कमधील 73.37% भाग भांडवलांचे अप्रत्यक्ष मालक मिळविण्यासाठी करार केला आहे. मँडरिन हॉटेल न्यूयॉर्क शहरातील प्रीमियम लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, ब्रिटनचा पहिला आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट, स्टोक पार्क, 592 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये, रिलायन्सने यूकेमध्ये स्टोक पार्क लिमिटेड विकत घेतले, जिथे दोन जेम्स बाँड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
ग्राहक आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आरआईएल च्या धोरणाचा हा एक भाग आहे. समूहाची ओबेरॉय हॉटेल्स, ओबेरॉय हॉटेल्स मध्ये गुंतवणूक आहे आणि बकिंगहॅमशायरमधील 300 एकरचे स्टोक पार्क कंट्री क्लब विकत घेतले आहे. तसेच, मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल्स आणि निवासस्थान विकसित करत आहेत.
(डिस्क्लेमर- नेटवर्क18 आणि TV18 कंपन्या चॅनल/वेबसाइटचे संचालन करतात, ज्याचे नियंत्रण स्वतंत्र मीडिया ट्रस्टद्वारे केले जाते. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.