MPSCच्या एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या परीक्षा लांबणीवर, कोरोनामुळे आयोगाचा निर्णय

MPSCच्या एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या परीक्षा लांबणीवर, कोरोनामुळे आयोगाचा निर्णय

उमेदवारांनी जो अधिकृत मोबाईल नंबर दिला आहे त्यावर त्यांना SMSच्या माध्यमातून नवीन तारीख कळविण्यात येईल.

  • Share this:

मुंबई 07 एप्रिल : राज्यात कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नसल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC एप्रिल आणि मे महिन्या होणाऱ्या परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. येत्या 26 एप्रिल रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि 10 मे रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यमसेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे आयोगाने ही माहिती दिली आहे. या परीक्षा पुढे केव्हा होतील त्याची माहिती आयोगाने दिलेली नाही. परीक्षांच्या नव्या तारखा या योग्य वेळी जाहीर केल्या जातील. उमेदवारांनी जो अधिकृत मोबाईल नंबर दिला आहे त्यावर त्यांना SMSच्या माध्यमातून नवीन तारीख कळविण्यात येईल. उमेदावारांनीही वेळोवेळी आयोगाची अधिकृत वेबसाईट बघावी असंही आयोगाने म्हटलं आहे.

राज्य सरकार करत असलेल्या सर्व प्रयत्नानंतरही मुंबईत कोरोनाचा विळखा वाढत आहे. दररोज नवे रुग्ण सापडत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आता टेस्टिंगची संख्या वाढवली आहे. त्यामुळे जास्त रुग्ण सापडत आहे. ही संख्या वाढत असल्याने मुंबई महापालिकेने 4 हॉटस्पॉट निश्चित केले आहेत. हे 4 हॉटस्पॉट 4 वॉर्ड्समध्ये आहेत. यात G दक्षिण म्हणजे वरळी कोळीवाडा,  प्रभादेवी या भागांचा समावेश होतो. तिथे आता 78  रुग्ण आहेत. त्यानंतर E वॉर्ड भायखळाचा समावेश होतो जिथे 48 रुग्ण सापडले आहेत. तर D वॉर्ड म्हणजे ताडदेव मध्ये 43 रुग्ण सापडले  आहेत. K वेस्ट म्हणजेच अंधेरी पश्चिममध्ये 40 रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू होऊ शकतो ‘भीलवाडा मॉडेल’

या सर्व भागांना सील करण्यात आलं आहे. त्या भागातून बाहेर जायला आणि प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या भागांमध्ये 40 पेक्षा अधिक रुग्ण आहेत त्या वॉर्डांना अतिधोकादायक वॉर्ड किंवा अतिसंवेदनशील भाग म्हणून ठारविण्यात आला आहे.

आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे तब्बल 75 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात 5 हजार लोकांचा जवळजवळ मृत्यू झाला आहे. तर, 13 लाख 48 हजार 628 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत इटलीमध्ये सर्वात जास्त 16 हजार 523 लोकांचा मृत्यू झाला आहे.

COVID-19 : गरिबांना मोदी सरकाराचा मदतीचा हात, आर्थिक साहाय्यासाठी 6,834 कोटी

चीनमधून पसरण्यास सुरुवात झालेल्या कोरोनाने युरोप आणि अमेरिकेत थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशाचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे अमेरिकेत तब्बल 3 लाख 50 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 11 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेन, इटली, जर्मनीमधील परिस्थिती बिकट आहे. जर्मनीमध्ये एकाच दिवशी तब्बल 30 हजार कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले. स्पेनमध्येही कोरोनाचा धोका वाढत आहे. स्पेनमध्ये 13 हजार 341 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

 

 

First published: April 7, 2020, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading