मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

MPSC आयोगाचा पारदर्शक पाऊल, विद्यार्थ्यांना मिळणार 'या' वेबसाईटवर उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज!

MPSC आयोगाचा पारदर्शक पाऊल, विद्यार्थ्यांना मिळणार 'या' वेबसाईटवर उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज!

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 करीता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज...

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 करीता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज...

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 करीता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज...

    मुंबई, 22 ऑक्टोबर : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Commission maharashtra) वेगवेगळ्या परीक्षांच्या तारखा जाहीर होत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना आपला निकाल आणखी पारदर्शक पद्धतीने पाहता यावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज ( scanned image of answer sheet) निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गूण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा दिली जाणार आहे. अशी सुविधा देणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पारदर्शकता ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 27 मार्च, 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 (Maharashtra Civil Engineering Service Pre-Examination 2020) करीता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सोमांकन रेषा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दंश करून शेजारीच लपला कोब्रा, नाग पकडण्यासाठी आली JCB; पाहा VIDEO महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा, २०२० करिता उपस्थित सर्व उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज निकालाकरिता गृहित धरलेले एकूण गूण व उमेदवाराच्या संबंधित प्रवर्गांकरिताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet या वेबलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशी मिळेल उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज!  १) आयोगाच्या https://mpsc.gov.in/ या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES मधील View Marksheet: लिंकवर क्लिक करावे. २) उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करावी. ३) परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाइल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी प्रविष्ट करुन लॉग-इन करावे ४) लॉग-इन केल्यानंतर गूणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेता येईल. विहित कार्यपध्दतीनुसार गुणपत्रक व स्कॅन उत्तरपत्रिका उपलब्ध करून घेताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास आयोगाच्या १८००१२३४२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा support online@mpsc.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल. उपरोक्त सुविधा ही वरील वेबलिंकवर दिनांक 10 नोव्हेंबर, 2021 पर्यंत उपलब्ध राहील.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या