धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 15 फेब्रुवारी : जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमतरता असते. काही जणांच्या आयुष्याला असाध्य आजार, अपंगत्न यो गोष्टींमुळे मोठा सेटबॅक मिळालेला असतो. या सेटबॅकवर जिद्दीनं मात करणारी मंडळी पाहिली की धडधाकट माणसालाही त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. मुंबईतील अक्षय परांजपे हा देखील असाच एक जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात करणारा दुर्मीळ व्यक्ती आहे. प्रोफेशनल फोटोग्राफर असलेल्या अक्षयची गोष्ट प्रत्येकालाच प्रेरणा देणारी आहे. थरथरत्या हातानं फोटोग्राफी अक्षयला ‘विल्सन डिसीज’ हा आजार आहे. या आजारामुळे त्याचं शरीर थरथरत असतं. फोटोग्राफी करण्यासाठी शरीर आणि मन स्थिर हवं. हालचालींवर आणि मनावर नियंत्रण असेल तरच उत्तम फोटोग्राफर बनता येतं असं मानलं जातं. अक्षयनं हा समज खोटा ठरवलाय. तो गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्यामध्ये उत्तम फोटोग्राफी करतोय. तो कोणताही फोटो अगदी परफेक्ट क्लिक करतो. उत्तम पद्धतीनं एडिट करतो. कारण, फोटोग्राफी हे त्याचं पॅशन आहे.
‘अक्षयला विल्सन आजार झाल्याचं 2011 साली कळालं. त्यावेळी तो 16 वर्षांचा होता. त्याची वागणूक बदलली होती. शाळेत सर्वात हुशार असणारा, मस्ती करणारा अक्षय आजारी पडल्यावर 7-8 वर्ष आम्हाला खूप त्रास झाला. सतत पळणारा मुलगा स्वस्थ पडलेला पाहून खूप वाईट वाटायचं,’ असं अक्षयच्या आजी सुनिता परांजपे यांनी सांगितलं. 75 वर्षांच्या कॅन्सरग्रस्त आजोबांचे अफाट संशोधन, पाणी आणि पेट्रोलवर चालणार गाडी Video हा आजार काय आहे हे त्यांच्या कुटुंबीयांना सुरूवातीला कळालं नाही. अक्षयचे वडील संतोष परांजपे यांनी तो अनुभव सांगितला आहे. ‘अक्षय दहावीपर्यंत छान होता. तो खूप बिनधास्त होता. उत्तम बॅडमिंटन खेळायचा. अभ्यासू होता. पण, अक्षय अचानक शांत झाला होता. त्याचे हात-पाय अर्थात संपूर्ण शरीर हलायला लागलं होतं. या आजारामुळे अक्षय चार वर्ष संपूर्ण अंथरुणावर पडून होता. 4 वर्ष अंथरुणाला खिळून या आजारामुळे अक्षय चार वर्ष अंथरुणाला खिळून होता. त्या काळात त्याच्या आईनं आणि बहिणीणं त्याला सर्वाधिक सांभाळलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अक्षय आज चालू शकतो. त्याचं सर्वाधिक श्रेय त्याच्या बहिणीला आहे.’ हृदयस्पर्शी पुनर्मिलन! बांद्रा रेल्वे स्थानकावर झाली चुकामूक; आजीला कसं मिळालं पुन्हा कुटुंब ‘आज अक्षय खूप उत्कृष्ट फोटोग्राफर झाला आहे. त्याला त्याच्या आजोबांनी कॅमेरा घेऊन दिला. तो स्वतःहूनच कॅमेऱ्याचं शिक्षण घेतलं. रत्नागिरीचा असल्यामुळे अक्षयला निसर्गाची साथ लाभली. त्याच्यातील कलाकार बाहेर आला. अक्षय अनेक हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांचे वैयक्तिक छायाचित्र काढतो. सचिन पिळगावकर, विक्रम गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते, शिल्पा तुळसकर, संदीप खरे अशा दिग्गज कलाकारांसोबत अक्षयने काम केलं आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.