Home /News /mumbai /

Monsoon Season: देवेंद्र फडणवीस सभागृहात भडकले, हेडफोन दिला फेकून!

Monsoon Season: देवेंद्र फडणवीस सभागृहात भडकले, हेडफोन दिला फेकून!

भुजबळांनी पुराव्यानिशी फडणवीसांचा काळात झालेल्या पत्रव्यवहारच सभागृहात वाचून दाखवला.

    मुंबई, 05 जुलै : ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरून पावसाळी अधिवेशनात (monsoon season Maharashtra)भाजप आणि सत्ताधारी आमदारांमध्ये जोरदार राडा पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्यानंतर बोलू दिलं नाही म्हणून विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी तीव्र संताप व्यक्त करत माईकच फेकून दिला. राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला आणि तो मंजूर केला. पण यावेळी भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. भुजबळांनी पुराव्यानिशी फडणवीसांचा काळात झालेल्या पत्रव्यवहारच सभागृहात वाचून दाखवला. त्यावर फडणवीस हे बोलण्यासाठी उभे राहिले पण सभापती भास्कर जाधव यांनी त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या व्यासपीठाला घेराव घातला. इकडे बोलू न दिल्यामुळे फडणवीस यांनी माईकच फेकून दिला. या गोंधळातच ओबीसी आरक्षणाबाबतच ठराव मंजूर करण्यात आलं. पण, भाजप आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पण, त्यानंतर भास्कर जाधव दालनाकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला.  यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे  काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भुजबळांची बॅटिंग '2017 साली केस सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपण 2019 पर्यंत काहीच केलं नाही. 1 ऑगस्ट 2019 ला नीती आयोगाला तुम्हीच पत्र लिहिलं आणि भारत सरकारकडे डेटा मागितला होता. भारताचे रजिस्टर जनरल यांना ही पत्र लिहून तुम्ही डेटा मागितला होता.  त्यावेळी आमदार छगन भुजबळ यांनी तुम्हाला दुसऱ्याच दिवशी पत्र लिहिले होते. हा डेटा मिळावा म्हणून पंकजा मुंडे यांनी ही सोशल जस्टीस विभागाला पत्र लिहिलं होतं. नंतर रामदास आठवले यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता, मग तुम्ही 15 महिने काही केलं नाही असं सरकारवर आरोप करताय, मग 2019 पर्यंत काय केलं, डेटा मागण्यासाठी पत्र का लिहिले, असा थेट सवाल भुजबळांनी केला. 'एवढी वर्ष तुम्ही जनगणना का नाही केली. सात वर्षे झालं तुमच्या सरकारला चुका सांगत आहोत. मग दुरुस्ती का केली नाही. तुम्ही पाच वर्षात काय केलं. तुम्ही प्रयत्न केला, कोर्टाला सांगितलं, तुमचे प्रयत्न कमी पडतात म्हणून आम्ही सभागृहाला सांगत आहोत, पंतप्रधान मोदींना सांगत आहोत की डेटा आम्हाला द्या, असंही भुजबळ म्हणाले. 'फडणवीस साहेब म्हणाले सत्ता आली तीन महिन्यात आरक्षण देतो. आरक्षण महत्वाचं आहे तर सत्ता काय गरजेची. तुम्ही पंतप्रधानांकडे डेटा मागा, श्रेय तुमचे चला. पण तुम्ही शब्द छळ करता. चुका झाल्या तर दुरुस्त करायला पाहिजे होत आता सांगता तपासात आहोत. मग सहा सात वर्षे काय केलं? असा सणसणीत टोला भुजबळांनी फडणवीसांना लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Mumbai, Season, Session

    पुढील बातम्या