मुंबई, 16 डिसेंबर : पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) ‘जय महाराष्ट्र’ केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे मनसेला एक धक्का बसला आहे. त्यातच आता मनसेच्या एका नेत्याने शिवसेना नेत्यांची भेट घेतली आहे. मनसे नेते अभिजीत पानसे (MNS leader Abhijeet Panse) यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची गुप्त भेट घेतली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभिजीत पानसे यांनी शिवसेनेचे नेते उदय सामंत यांची गुप्त भेट घेतली आहे. यावेळी युवासेना सचिव वरूण सरदेसाई देखील उपस्थित असल्याची माहीती मिळत आहे. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता रुपाली पाटील यांच्या पाठोपाठ अभिजीत पानसे ही मनसेला जय महाराष्ट्र करणार का..? असा सवाल उपस्थित होत आहे. अभिजीत पानसे हे उदय सामंत यांना भेटले आणि त्यावेळी वरूण सरदेसाई सुद्धा उपस्थित होते. या भेटी दरम्यानचा एक फोटोही समोर आला आहे. वाचा : नवी मुंबईत भाजपला शह देण्यासाठी MVAची जबरदस्त खेळी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय काय म्हणाले उदय सामंत? अभिजित पानसे यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्याने चर्चांणा उधाण आले आहे. या भेटीवर उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, अभिजीत पानसे मनसेचे नेते आहेत. त्यांच्या वडिलांच्या एका कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी आले होते. राजकीय चर्चा झालेली नाही. भेटीत कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा जरी उदय सामंत यांनी केला असला तरी राजकारणात कधी काय होईल याचा कुणीही अंदाज वर्तवू शकत नाही. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राजकीय पक्षांत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. वाचा : रुपाली पाटील यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’, ‘या’ दोन नेत्यांवर केला गंभीर आरोप रुपाली पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यामुळे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रुपाली पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रुपाली पाटील यांनी मनसेतून बाहेर पडल्याने पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कुठून सुरू झाला वाद? रूपाली पाटील यांचा सगळा वाद सुरू झाला तो समीर वानखेडे प्रकरणावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर… समीर वानखेडे यांनी दलितांवर अन्याय केल्याचे आरोप होत आहेत तर त्याची चौकशी करायला हवी अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र त्यावरून पक्षाचे उपनेते बाबू वागस्कर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद झाला होता. प्रवक्ते पद नसताना रूपाली पाटील यांनी पक्षाच्या भूमिका मांडायला नको असं वागस्कर यांचं म्हणणं होतं. मात्र रुपाली पाटील यांनी त्याला जोरदार विरोध केला. वागसकर यांच्या पत्नीलाच शहराध्यक्ष पद देऊन माध्यमांना केवळ त्यांच्याशीच बोलावं असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे रूपाली पाटील कमालीच्या दुखावल्या होत्या. आपण सगळ्या तक्रारी राज ठाकरेंपर्यंत पोहोचवल्या मात्र त्यावर काहीही कारवाई झाली नाही. आपला आता त्यांच्यावर कुठलाही रोष असून कालही आपले दैवत होते आजही आहे आणि उद्याही राहतील अस ही रुपाली पाटील यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.