तुषार रूपनवर, प्रतिनिधी
मुंबई, 21 ऑक्टोबर : क्रूझवरील ड्रग्ज (Drug) प्रकरणात एनसीबीने (NCB) केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या बहिण असलेल्या जास्मिन वानखेडे (Jasmin Wankhede) यांच्यावरही आरोप केला होता. याप्रकरणी आता मनसेने नवाब मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आपण जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचंही म्हटलं आहे.
अमेय खोपकर यांनी म्हटलं, जास्मिन वानखेडे मनसे चित्रपट सेनेच उत्तम काम करत आहेत. जास्मिन वानखेडे आणि एनसीबी बरोबर काहीही संबंध नाही. समीर वानखेडे आणि मनसे काहीही संबंध नाही. नवाब मलिक यांना एवढं समजत नाही महिलेवर तुम्ही खालच्या पातळींवर जाऊन टीका करता.
तुमचे जावई जेलमध्ये होते त्याचा राग तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांवर का काढताय? जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेले आरोप धाधांद खोटे आहेत. मुंबई पोलीस आणि एनसीबी जे काम ड्रग्ज संदर्भात करत आहे. ते अत्यंत काम अभिमानास्पद करत आहे. यापुढे जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही असंही अमेय खोपकरांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी 16 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. एनसीबीने कारवाई दरम्यान बनवलेला पंच फ्लेचर पटेल (Fletcher Patel) कोण आहे? तसेच फ्लेचर पटेलसोबत फोटोत असणारी लेडी डॉन (Lady Don) कोण आहे? असा सवालही नवाब मलिक यांनी विचारला होता.
नवाब मलिक यांनी म्हटलं, एनसीबीच्या कारवाईत पंचनामा करण्यासाठी स्वतंत्र पंच असलेला फ्लेचर पटेल कोण आहे? फ्लेचर पटेल याच्यासोबत फोटो असलेली लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल त्यांच्यासोबत कुठे-कुठे जातो? मुंबईत कसलं रॅकेट सुरू आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या सोबत फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत? इंडस्ट्रीत दहशत निर्माण करुन पैसे उकळण्याचे काम करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मी एनसीबीला सांगतो की एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करावा.
फ्लेचर पटेल ज्या महिलेसोबत आहे ती एका पक्षाच्या चित्रपट सेनेची कार्यकर्ता आहे. ती वकील सुद्धा आहे. फिल्म इंडस्ट्रीतील बरेच लोक तिच्या कार्यालयात हजेरी लावत आहेत. वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करत आहेत. जेव्हा माहिती मिळेल तेव्हा या संदर्भातीलही पर्दाफाश करेल असंही नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Nawab malik, NCB, NCP