शारदीय नवरात्र सुरवात घटनास्थापना निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक तुळशी व फुलांची सजावट (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
2/ 8
शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात झाली. आजच्या या दिवशी तुळस, शेवंती, झेंडू, जरबेरा, कागडा, कामिनी आणि गुलाबाच्या फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
3/ 8
विठुरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक तुळशीच्या व फुलांच्या माळाची सजावट केली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
4/ 8
पुण्यातील विठ्ठल भक्त श्री राम जांभुळकर यांच्याकडून ही मंदिर सजावट करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
5/ 8
नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आल्याने भाविकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
6/ 8
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्यानुसार राज्यातील सर्व धार्मिकस्थळे उघडण्यात आली आहेत. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
7/ 8
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)
8/ 8
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर या सर्व नियमांचे पालन करुनच मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. (फोटो सौजन्य: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती)