Home /News /maharashtra /

कोरोनाची लागण झाल्यानंतर SRPF जवानांचं बेजबाबदार वर्तन

कोरोनाची लागण झाल्यानंतर SRPF जवानांचं बेजबाबदार वर्तन

Representative Image

Representative Image

हिंगोली येथील 84 एसआरपीएफ जवानांना एकापाठोपाठ एक कोरोनाची बाधा झाली आहे.

    कन्हैया खंडेलवाल, हिंगोली, 8 मे : हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 मधील 194 अधिकारी व जवान कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मुंबई व मालेगाव येथून बंदोबस्त करून हिंगोलीत परतले आहेत. त्यानंतर यातील 84 एसआरपीएफ जवानांना एकापाठोपाठ एक कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्व जवानांवर हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना काही जवान उपचारांना प्रतिसाद देत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोर श्रीवास यांनी एसआरपीएफ समादेशक मंचक इप्पर यांना दि.7 मे रोजी लेखी पत्र दिले आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेले जवान हे आपल्या बेडवर न थांबता वॉर्डमध्ये व रुग्णालयाच्या गच्चीवर फिरत असल्याचे एका व्हिडिओ क्लिपमधून समोर आले आहे. सदर व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे रुग्णालय परिसरात वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये कोरोना बाधित जवान गच्चीवर फिरताना दिसत आहेत. तसेच यापूर्वी दि.5 मे रोजी रुग्णालयातील एका परिचारिका यांनी देखील जवानांच्या वागणुकीबाबत लेखी तक्रार केली आहे. उपचार घेत असलेले एसआरपीएफचे जवान परिचारिका, कक्षसेवक व सफाई कामगार यांना म्हणत आहेत की, आम्हाला कोरोना झाला आहे. आम्ही तुम्हाला पण संसर्ग केल्याशिवाय सोडणार नाही, आम्ही असेच फिरणार, तुम्ही आमचे काहीच करू शकत नाही. असे बोलून हे जवान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत‌ असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारात खरोखरच तथ्य असेल तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी , अशी मागणी आता समोर येत आहे. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या