जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता; वसतिगृह हत्या प्रकरणात नवी माहिती समोर

तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता; वसतिगृह हत्या प्रकरणात नवी माहिती समोर

मरीन ड्राईव्ह हत्या प्रकरणात नवी माहिती समोर

मरीन ड्राईव्ह हत्या प्रकरणात नवी माहिती समोर

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात 6 जून रोजी सावित्रीबाई फुले वसतीगृहात एका मुलीचा मृतदेह विविस्त्र अवस्थेत आढळून आला. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली. अशातच आणखी एक महत्त्वाची अपडेट याप्रकरणी समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 9 जून : मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात 6 जून रोजी सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका मुलीचा मृतदेह विविस्त्र अवस्थेत आढळून आला. या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली. या तरुणीवर जबरदस्ती करुन तिची हत्या केल्याचा संशय वसतिगृहाच्या सुरक्षारक्षवार घेण्यात आला. या घटनेत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. अशातच आणखी एक महत्त्वाची अपडेट याप्रकरणी समोर आली आहे. मरीन ड्राईव्हच्या या पिडीत तरुणीचा शवविच्छेदन रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला. या अहवालात तरुणीवर अत्याचार झाला याविषयी एकही पुरावा मिळाला नाही. अजून पूर्ण अहवाल समोर आला नसून याविषयी अजून चाचण्या घेण्यात येणार आहे. Mumbai News : चर्चगेटच्या वसतिगृहात तरुणीचा खून करून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या; गूढ वाढले तरुणीच्या हत्या प्रकरणात ही गोष्ट देखील समोर आली की, सुरक्षा रक्षकाने यापूर्वीही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. तिनं ही गोष्ट तिच्या मैत्रिणीलाही सांगितली होती. मुलीचा मृतदेह सापडला तेव्हा सुरक्षा रक्षकही गायब होता. त्यानंतर त्यांनंही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. तरुणी दोन दिवसांनी तिच्या घरी जाण्यासाठी तयारी करत होती अशीही माहिती पोलिसांनी दिलीय. तर घटनेनंतर फरार झालेला सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया याचा मोबाईल इमारतीत सापडला होता. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी केली जात आहे. ओमप्रकाशने बलात्कार केल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली होती. मात्र आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यामुळे याविषयी अधिक चौकशी केली जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात