जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Mumbai News : चर्चगेटच्या वसतिगृहात तरुणीचा खून करून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या; गूढ वाढले

Mumbai News : चर्चगेटच्या वसतिगृहात तरुणीचा खून करून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या; गूढ वाढले

चर्चगेटमधील वसतिगृहात तरुणीचा खून

चर्चगेटमधील वसतिगृहात तरुणीचा खून

Mumbai News : तरुणी दोन दिवसांनी तिच्या घरी जाण्यासाठी तयारी करत होती अशीही माहिती पोलिसांनी दिलीय. तर घटनेनंतर फरार झालेला सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया याचा मोबाईल इमारतीत सापडला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 जून : चर्चगेट परिसरात असलेल्या मुलींच्या वसतीगृहात तरुणीची हत्या करून वसतीगृहाच्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणीवर अतिप्रसंग करून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले महिला वसतीगृहात ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, चर्चगेट परिसरात मुलींसाठी सावित्रीबाई फुले महिला वसतीगृह आहे. या वसतीगृहात चौथ्या मजल्यावर तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर हॉस्टेलचा सुरक्षा रक्षक बेपत्ता होता. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सुरक्षा रक्षकाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. Mumbai News : चर्चगेटमधील वसतिगृहात तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला; नेमकं काय घडलं?   हत्या केल्यानतंर सुरक्षारक्षकाने चर्नी रोड स्थानकात रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ओमप्रकाश कनोजिया असं त्याचं नाव असून तो गेल्या १८ वर्षांपासून वसतीगृहात सुरक्षारक्षकाचे काम करत होता. पीडितेवर अतिप्रसंग करून त्याने तिची हत्या केली आणि स्वत: रेल्वेखाली उडी मारत जीव दिला. तरुणी दोन दिवसांनी तिच्या घरी जाण्यासाठी तयारी करत होती अशीही माहिती पोलिसांनी दिलीय. तर घटनेनंतर फरार झालेला सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया याचा मोबाईल इमारतीत सापडला होता. आता त्याचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी केली जात आहे. ओमप्रकाशने बलात्कार केल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याचा उलगडा होईल असं पोलिसांनी म्हटलंय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात