मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai Band: नवी मुंबईत ऐरोली ते वाशी बेस्ट बस सेवा पूर्णपणे बंद

Mumbai Band: नवी मुंबईत ऐरोली ते वाशी बेस्ट बस सेवा पूर्णपणे बंद

त्या 9 ऑगस्टला आंदोलकांकडून ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला

त्या 9 ऑगस्टला आंदोलकांकडून ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला

त्या 9 ऑगस्टला आंदोलकांकडून ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला

    नवी मुंबई, २५ जुलैः मराठा आंदोलनामुळे काल २४ जुलैला मराठवाडा, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग पूर्णपणे बंद होता. आज २५ जुलैला या आंदोलनाची झळ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना बसणार आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, सातारा या प्रमुख शहरांमध्ये आज आंदोलन करण्यात येणार आहे. नवी मुंबई येथील घणसोली येथे आज पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशीपर्यंतची बेस्ट सेवा पूर्ण बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईत जाण्यासाठी ठाणे- वाशी रेल्वेने प्रवास करणं सोयीस्कर ठरणार आहे. नवी मुंबईतील अनेक शाळा कॉलेजमधील मुलांना कोणतीही पूर्व कल्पना न देता घरी पाठवण्यात आले. या सगळ्या गदारोळात सर्वसामान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

    सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईत आयोजीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान येत्या 9 ऑगस्टला आंदोलकांकडून ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला. ठाण्याच्या तीन हात नाका ते ज्ञानसाधना कॉलेज रोड आंदोलनकर्त्यांकडून जाम करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने मोर्चेकरी रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मोर्चेकरांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. या सगळ्याचा अंदाज घेत पोलिसांचा मोठा ताफा जागोजागी तैनात करण्यात आला आहे. पण मोर्चेकरांच्या गर्दीने ठाणे पूर्व मार्ग पूर्णपणे जाम झाला आहे.

    सध्या मुंबईच्या माटुंगा, दादर भागातही जनजीवन सुरळीत आहे. दादर प्लाझा भागात नेहमीप्रमाणं वर्दळ आहे. भाज्यांचे टेम्पो, टॅक्सी, बसेस सुरळीतपणे सुरू आहे. किंग्ज सर्कल, दादर प्लाझा भागात पोलिसांच्या गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई अद्याप सगळं सुरूळीत आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या शहरात विविध भागात असणारेत. तसंच दंगल नियंत्रण पथकालाही तैनात करण्यात आलंय. मोर्चेकऱ्यांच्यात साध्या वेशात स्पेशल ब्रांचचे अधिकारीही असतील. त्याचबरोबर क्राईम ब्रांच आणि प्रोटेक्शन ब्रांचलाही अलर्टवर ठेवण्यात आलंय. याबरोबरीनं स्थानिक पोलिसांचीही मोठ्या प्रमाणात कुमक विविध उपनगरात असेल.

    हेही वाचा-

    लोकलच्या दारात पदर अडकला,जीव थोडक्यात वाचला

    भिवंडी 3 मजली इमारतीचा भाग कोसळला, 5 बचावले पण 1 महिलेचा मृत्यू

    पाकिस्तानात पंतप्रधानांच्या गादीवर कोण बसणार? आज मतदानाला सुरूवात

    First published:

    Tags: Maratha kranti morcha, Maratha reservation, Mumbai, Thane, ठाणे, नवी मुंबई, मराठा आरक्षण, मराठा क्रांती मोर्चा, मुंबई