• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING: मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

BREAKING: मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Man attempts suicide in front of Mantralaya Mumbai: मंत्रालयाच्या गेट समोर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

  • Share this:
मुंबई, 20 ऑगस्ट : मंत्रालयाच्या (Mantralaya) गेट समोर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न (attemptes suicide) केल्याची माहिती समोर येत आहे. विष प्राशन करत या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या परिसरात उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. हा व्यक्ती कोण आहे, कुठून आला आहे तसेच त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला? या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. या व्यक्तीच्या संदर्भात पोलीस अधिक माहिती घेत आहेत. दरम्यान मंत्रालयाच्या गेटसमोर झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात वाहतूक पोलिसांची मुजोरी; नो पार्किंगमधील गाडी चालकासह उचलली, LIVE VIDEO मंत्रालयात आपल्या प्रलंबित मागण्या, कामांसाठी राज्यभरातून नागरिक मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी येत असतात. यापूर्वी मंत्रालयाच्या आतमध्ये एका व्यक्तीने पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या मधल्या भागात संरक्षक जाळी बसवली. या सुरक्षा जाळीमुळे मंत्रालयात असे प्रकार थांबवण्यात सरकारला यश आलं आहे. मात्र, आता मंत्रालयाच्या गेट समोर या तरुणाने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
Published by:Sunil Desale
First published: