मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; माजी उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी गजाआड

मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई; माजी उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी गजाआड

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

मुंबई,  6 जानेवारी : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे आमदार सुदेशकुमार महातो यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला आज  मुंबईतून अटक करण्यात आली.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिवाजीनगर परिसरातून या आरोपीला अटक केली आहे. आमदार सुदेशकुमार महातो (Sudeshkumar Mahato) यांच्याकडे 15 लाखांची खंडणी आरोपीने मागितली होती. पैसे न दिल्यास गोळी मारण्याची धमकी त्याने दिली होती. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. (action of Mumbai Police Crime Branch accused of threatening to kill former deputy chief minister ) या आरोपीचं नाव निलेश कमलेश पांडे (25) असे असून हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा-औरंगाबादमध्ये शाळा झाल्या सुरू; दोन शिक्षक आढळले कोरोना पॉझिटिव्ह

दुसरीकडे राज्यात कोरोनाची लशीच्या वितरणासाठी यंत्रणा उभी केली जात आहे. देशातील प्रत्येक नागरिक आज कोरोनाची (Coronavirus) लशीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आले असली तरी नवकोरोनाची भीती कायम आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा दुप्पट झाला आहे. बुधवारी 60 पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 4 जानेवारी रोजी 29 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती. त्यानुसार सोमवारच्या तुलनेत मंगळवारी मृतांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai police