औरंगाबादमध्ये शाळा झाल्या सुरू; दोन शिक्षक आढळले कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबादमध्ये शाळा झाल्या सुरू; दोन शिक्षक आढळले कोरोना पॉझिटिव्ह

मुलांना कोरोना धोका असल्याने शाळेत पाठविण्यासाठी अनेक पालकांकडून विरोध केला जात आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 4 जानेवारी : राज्यातील काही भागात इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. गेल्या 7 ते 8 महिन्यांहून जास्त काळापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Coronavirus) राज्यातील शाळा बंद होत्या. गेल्या काही दिवसांपासून परिस्थितीत पूर्ववत होत आहे. सोमवारपासून औरंगाबाद जिल्ह्यातील काही शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातच शाळेतील 2 शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

पहिल्याच दिवशी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचा नेमका आकडा लवकर जाहीर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिकेच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता 9 वी व 10 वीची शाळा सुरू करण्यात आली आहे.  औरंगाबाद महानगरपालिकेने शाळेतील सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. डिसेंबर 28 ते 3 जानेवारीपर्यंत 1359 शिक्षण आणि कर्मचाऱ्यांची चाचणी (RT-PCR tests) करण्यात आली आहे. दोन शिक्षक आणि 1 कर्मचाऱ्याला आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा-राम मंदिर उभारणीत पुन्हा नवं संकट; पायाभरणीला 5 महिने उलटून गेले तरी...

राज्यात एकूण 19,42,136 कोरोनाचे रुग्ण आहेत. 49666 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार दिवसभरात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी फक्त 3 रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईतील मृत्यूचा आकडा कमी झाल्यानं सरकार आणि बीएमसीच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं दिसतं आहे.  मुंबईत एकूण 11135 रुग्णांचा कोरोनानं जीव घेतला आहे. राज्याचा मृत्यूदर 2.56% आहे. दरम्यान भारतात कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन कोरोना लशींना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी कोवॅक्सिन ही लस यूकेत आढळलेल्या नव्या कोरोनाविरोधात प्रभावी आहे. तर आता कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनलाही आयसोलेट करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळालं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 4, 2021, 3:45 PM IST

ताज्या बातम्या