जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ...आणि अजितदादा स्टेजवर आले, समोर संजय राऊत उभे, नेमकं काय घडलं? Video

...आणि अजितदादा स्टेजवर आले, समोर संजय राऊत उभे, नेमकं काय घडलं? Video

अजित पवार-संजय राऊत आमने-सामने

अजित पवार-संजय राऊत आमने-सामने

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या बीकेसी मैदानात महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. अजित पवार व्यासपीठावर आले तेव्हा संजय राऊतही तिकडे होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 मे : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या बीकेसी मैदानात महाविकासआघाडीच्या वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी तीनही पक्षांचे नेते व्यासपीठावर दाखल व्हायला सुरूवात झाली, तेव्हा बोलकं चित्र पाहायला मिळालं. अजित पवार स्टेजवर दाखल झाले तेव्हा त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या नेत्यांना हस्तांदोलन केलं. शिवसेनेचे नेते संजय राऊतही वज्रमूठ सभेच्या स्टेजवर होते. अजितदादांनी संजय राऊतांना हस्तांदोलन केलं, पण दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं. एवढच नाही तर हस्तांदोलन केल्यानंतर संजय राऊतांनी अजितदादांकडे बघणंही टाळलं. काहीच दिवसांपूर्वी अजितदादा आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद झाला होता. सामनाच्या अग्रलेखामधून संजय राऊत यांनी राष्ट्रवादीमध्येही शिवसेनेसारखा प्रयोग होऊ शकतो, असं म्हणत अजित पवारांकडे अंगुली निर्देश केले होते. केंद्रीय यंत्रणांचा दबाव निर्माण करून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर याबाबत लिहिल्यामुळे अजित पवार सत्तेत सहभागी होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या.

जाहिरात

संजय राऊतांची ही वक्तव्य आणि सामनामधल्या अग्रलेखामुळे अजित पवार चांगलेच संतापले. महाविकास आघाडीतले काही नेते त्यांच्या पक्षाचं सोडून दुसऱ्या पक्षाचं कशाला बोलतात अशा शब्दात संजय राऊतांना फटकारलं. तुमच्या पक्षाचं मुखपत्र आहे त्यातून पक्षाबद्दलच लिहा दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल लिहण्याची गरनाही, आमचं वकीलपत्र घेण्याचीही गरज नाही, असंही अजित पवारांनी सुनावलं. राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी प्रवक्तेपद घेऊ नका असंही अजित पवार म्हणाले.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान अजितदादांनी फटकारल्यानंतरही संजय राऊत त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. त्यामुळे माझ्यावर खापर फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली होती तेव्हा तुम्ही आमची वकिली करत होता. हे आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्यासोबतचा घटक पक्ष मजबूत राहावा त्याचे लचके तुटले जाऊ नये, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांच्या या भूमिकेनंतर पुन्हा एकदा अजितदादांना याबाबत प्रश्न विचारला असता, कोण संजय राऊत? असा टोला त्यांनी लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात