मुंबई, 08 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी अलीकडेच स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये भाषण केलं होतं. आज त्याच ठिकाणी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी महाराष्ट्रासाठी पुरस्कार स्विकारला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून ( United Nations Climate Change Council ) दखल घेतली असून महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) (Inspiring Regional Leadership) साठी पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राला अंडर-2 कोईलेशन फॉर क्लायमेट अॅक्शनकडून हा पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमध्ये अंडर-2 कोलिशन फॉर क्लायमेट अॅक्शनतर्फे तीनपैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या हवामान भागीदारी आणि क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्सची ही येथे विशेष दखल घेतली गेली. शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान असल्याचं आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
Last evening, Maharashtra received the award for Inspiring Regional Leadership. We also received high commendations for Climate Partnerships & Creative Climate Solutions. We dedicate this award to the citizens of Maharashtra & climate action ambitions of our great nation, India. pic.twitter.com/KR9jzFbHZ4
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 7, 2021
हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी दृष्टीकोन असणारे नेते आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या आणि हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. पर्यावरण जपण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच ‘माय प्लॅनेट’ ही चळवळ सुरू केली आहे, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. त्याचबरोबर आम्ही पंचमहाभूतांवरही लक्ष केंद्रित करत आहोत. राज्य सरकार पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ ऊर्जेचा विचार करीत आहे. नुकतेच एका महामार्गाचे सोलराइजेशन केले असून २५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. ‘ बर्फ नाही हा विषारी फेस! याच पाण्यात छठ पूजेसाठी भाविक मारतायत डुबकी पाहा VIDEO भूगोल, वंशाच्या सीमा, राष्ट्रीयत्व किंवा लिंगभेद नसलेल्या या जागतिक समस्येवर काम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि विधायक व अर्थपूर्ण कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवामान कृतीसाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व योगदानाबद्दल अंडर -2 कोईलेशनद्वारे मान्यता मिळाली याचा आम्हाला खरोखरच आनंद होत आहे, असंही ते म्हणाले. ‘हवामान कृतीसाठी वचनबद्ध असलेल्या सर्वात मोठ्या जागतिक नेटवर्क अंडर२ कोईलेशनतर्फे उपराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना मान्यता मिळाली आहे. तर, क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्ससाठी ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा) यांनी आणि हवामान भागीदारीसाठी क्वेबेक (कॅनडा) यांनी इतर दोन पुरस्कार जिंकले. महाराष्ट्राने अंडर२ च्या तीनही श्रेणींसाठी प्रवेशिका दिल्या होत्या. संयुक्त राष्ट्रांच्या ‘रेस टू झिरो’ उपक्रमामध्ये तसेच जागतिक स्तरावर हवामान बदलाबाबत संबोधित करण्यासाठी सी-४० शहरांच्या उपक्रमात देखील महाराष्ट्र सामील झाले आहे.