EXCLUSIVE: Remdesivir तुटवडा होणार दूर; ग्लोबल टेंडरमुळे राज्याला 10 दिवसांत मिळणार औषधांचा मोठा साठा

EXCLUSIVE: Remdesivir तुटवडा होणार दूर; ग्लोबल टेंडरमुळे राज्याला 10 दिवसांत मिळणार औषधांचा मोठा साठा

राज्यात रेमडेसिवीर औषधांचा निर्माण झालेला तुटवडा आता दूर होणार आहे. कारण परदेशातून ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 4 मे: महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात (Corona pandemic) निर्माण झालेला रेमडेसिवीर (Remdesivir)चा तुटवडा दूर करण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government)ने ग्लोबल टेंडर काढलं होतं. या ग्लोबल टेंडरला आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून आता पुढील 10 दिवसांत राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा साठा उपलब्ध होणार आहे.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देत म्हटले की, 10 लाख रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी ग्लोबल टेंडर महाराष्ट्र सरकारने काढलं होतं. या टेंडर प्रक्रियेत जगभरातील साधारणत: 13 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला. त्यांनी 50 हजार ते 3 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले आहे.

वाचा: सांगलीपाठोपाठ आता कोल्हापूरमध्ये 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन

पुढील 10 दिवसांत लाखाहून अधिक इंजेक्शन मिळणार

विजय वडेट्टीवार यांनी पुढे म्हटलं, काही कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. डॉलरमध्ये त्यांचे दर आहेत तर त्यासोबतच जीएसटी वाहतूक खर्चही जोडला जाईल. या सर्वांचा विचार करुन कमी दरात कोणते इंजेक्शन मिळेल याचा विचार करुन निर्णय घेण्यात येईल. पुढील 10 दिवसांत राज्यात किमान लाखभर रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आंतरराष्ट्रीय बाजारातून उपलब्ध होईल.

राज्यात हा रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा फायदा कोरोना बाधित रुग्णांना होणार आहे. कारण, सध्या गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना बाधितांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाहीये आणि रेमडेसिवीर अभावी अनेकांनी प्राणही गमावले आहेत. त्यामुळे परदेशातून येणारा हा साठा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा नक्कीच राज्याला होईल.

Published by: Sunil Desale
First published: May 4, 2021, 4:33 PM IST

ताज्या बातम्या