• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Maharashtra unlock: 22 जिल्ह्यांनी घेतला मोकळा श्वास; मुंबई, ठाणे unlock कधी?

Maharashtra unlock: 22 जिल्ह्यांनी घेतला मोकळा श्वास; मुंबई, ठाणे unlock कधी?

ब्रेक द चेनअंतर्गत लागू केलेली नवी नियमावली ही मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या जिल्ह्यांसाठी लागू ठरणार नाही.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑगस्ट : ब्रेक द चेनअंतर्गत (Break the Chain) राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधील निर्बंध कायम असणार आहे. त्याशिवाय उरलेले 22 जिल्ह्यांमधील नियम शिथिल करण्यात आले आहे. असे असले तरी नवी नियमावली मुंबई शहर (Mumbai Unlock), मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे (Thane Unlock Update) यासाठी नाही. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवतील, अशी माहिती समोर आली आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आज सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ब्रेक दि चेनचे आदेश जारी केले आहेत. ते उद्यापासून लागू होणार आहेत. हे ही वाचा-ब्रेक द चेनची नवी नियमावली; पुण्यासह या 11 जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम उर्वरित जिल्ह्यातील निर्बंधांमध्ये खालीलप्रमाणे सूट - सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी 3 पर्यंत सुरु राहतील. - रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील. - सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम, चालणे, धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत. - सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने  सुरु ठेवणार. प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करण्याची सुचना - जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवण्याची सुचना. - सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. - जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील. - चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सुट नाही. - राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील. - शाळा, महाविद्यालयांच्याबाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग निर्णय घेईल. - सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल. - रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही. - गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा, आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.
  Published by:Meenal Gangurde
  First published: