मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस नेत्याचे शिवसेना-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस नेत्याचे शिवसेना-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

काँग्रेस नेते विश्वबंधु राय यांनी सहयोगी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहे.

काँग्रेस नेते विश्वबंधु राय यांनी सहयोगी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहे.

काँग्रेस नेते विश्वबंधु राय यांनी सहयोगी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहे.

    मुंबई, 31 डिसेंबर: राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना (Shiv Sena),काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aaghadi) 'ऑल इज वेल' नसल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे विश्वबंधु राय (Vishvabandhu Rai) यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनाही विश्वबंधु यांनी पत्र लिहिलं आहे. काँग्रेस नेते विश्वबंधु राय यांनी सहयोगी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहे. दोन्ही पक्ष काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं विश्वबंधु यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 'महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसने एका वर्षात काय कमावलं आणि काय गमावलं', या मथळ्याखाली विश्वबंधु राय यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. काँग्रेस पक्षाच्या मदतीनं राज्यात उद्धव ठाकरे सरकार स्थापन झालं आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. राष्ट्रवादीला संबोधलं वाळवी... शिवसेना आणि राष्ट्रवादीच महाराष्ट्रात सरकार चालवताना दिसत आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी काँग्रेस संपवण्याचा कट रचला आहे. कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घेताना काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही, असंही विश्वबंधु राय यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीला त्यांनी वाळवी (दिमग) असं संबोधलं आहे. काँग्रेसनं एनसीपी आणि शिवसेना केलेली महाआघाडी आत्मघातकी ठरू शकते, असंही विश्वबंधु राय यांनी म्हटलं आहे. 2019 मध्ये काँग्रेसनं निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर कोणते कार्य होताना दिसत नाही. पक्षांतील गळती थांबवण्यासाठी देखील ठोस पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि एनसीपीला आघाडी धर्म काय असतो हेही समजावण्याची गरज असल्याचं विश्वबंधु यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या