जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / चर्चा तर होणारच : उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतरही गांधी-पवार यांचं मौन का?

चर्चा तर होणारच : उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतरही गांधी-पवार यांचं मौन का?

चर्चा तर होणारच : उद्धव ठाकरे सरकार पडल्यानंतरही गांधी-पवार यांचं मौन का?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार पडल्यानंतरही त्याचा काही परिणाम काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर झाला नाही का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जून : उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा बुधवारी दिला. या राजीनाम्याच्या वेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आभार मानले. या दोन्ही पक्षांनी शेवटपर्यंत साथ दिली, असं ठाकरे यांनी सांगितलं. ठाकरेंच्या राजीनाम्याला आता 18 तासांचा कालावधी उलटला आहे. त्यानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वोच्च नेत्यानं याबाबत कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या नेत्यांच्या मौनाचा अर्थ काय? असा प्रश्न विचारला जात आहे. शरद पवार गप्प महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भूमिका महत्त्वाची होती. गेली अडीच वर्ष पवार या सरकारचे मार्गदर्शक होते. मागील आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षातही शरद पवार सक्रीय झाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या.  पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवार यांनी एकही ट्विट केलेलं नाही. पवारांच्या राज्यात सत्ताबदल होत असताना आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पायउतार होत असताना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. काँग्रेस हायकमांडही गप्प काँग्रेस पक्षाच्या हायकमांडकडूनही उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर कोणतंही ट्विट करण्यात आलेलं नाही. राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा यांनी याबाबत सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.  देशात काँग्रेस अगदी मोजक्या राज्यात सत्तेत आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेस पक्ष आघाडीमध्ये सत्तेत होता. त्यानंतरही या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं मौन हे आश्चर्यकारक मानलं जात आहे. मी पुन्हा येतोय! फडणवीस-शिंदे राजभवनावर, आजच होणार शपथविधी! उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह न करता सभागृहात येऊन बोलले पाहिजे होते. त्यांनी लढण्याची ताकदच ठेवली नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे. काँग्रेस हायकमांडचीही तीच भूमिका होती का? त्या नाराजीमधूनच त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही का? सत्तेपूर्वी एकत्र आलेले हे तीन पक्ष सत्तेनंतरही एकत्र राहणार का? महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य काय आहे? असे प्रश्न आता विचारले जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात