Home /News /mumbai /

ATS प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती

ATS प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती

Jai Jeet Singh Thane CP: दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे, 21 मे: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. आता ठाणे पोलीस आयुक्त (Thane Police Commissioner)पदावर राज्याचे एटीएस प्रमुख जयजीत सिंग (Jai Jeet Singh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत आढळलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करत असताना एटीएसच्याच पथकाने सचिन वाझे (Sachin Vaze)च्या साथीदारांना जयजीत सिंग यांच्या नेत्रृत्वात अटक केली होती. आता त्याच जयजीत सिंग यांची बदली करण्यात आली आहे. इतकेच नाही तर सचिन वाझे याला गुजरातमधून सिमकार्ड देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा एटीएसच्याच पथकाने अटक केली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि त्याच दरम्यान जयजित सिंग यांची बदली ठाणे पोलीस आयुक्तपदावर करण्यात आली आहे. वाचा: ठाणे पोलीस आयुक्तपदासाठी अनेक IPS अधिकाऱ्यांची फिल्डिंग महाराष्ट्र दहशतवात विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनित अग्रवाल यांची एटीएस प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदी असलेले विवेक फणसाळकर यांची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली. विवेक फणसाळकर यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर ठाणे पोलीस आयुक्तपदावर कुणाची वर्णी लागणार याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली होती आणि त्यात जयजीत सिंग यांच्या नावाचाही समावेश होता. अखेर हे वृत्त खरे ठरलं असून जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Maharashtra police, Thane

पुढील बातम्या