Home /News /maharashtra /

ठाणे पोलीस आयुक्तपदी कोणाची लागणार वर्णी? अनेक IPS अधिकाऱ्यांची फिल्डिंग

ठाणे पोलीस आयुक्तपदी कोणाची लागणार वर्णी? अनेक IPS अधिकाऱ्यांची फिल्डिंग

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमवीर सिंग (Param bir Singh) यांना हटवण्यात आल्यानंतर राज्यात अनेक पोलीस आयुक्तांच्या (Police Commissioner) बदल्यांचे वारे सुरू झाले आहे.

ठाणे, 5 मे : मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग (Param bir Singh) यांना हटवण्यात आल्यानंतर राज्यात अनेक पोलीस आयुक्तांच्या (Police Commissioner) बदल्यांचे वारे सुरू झाले आहे. त्यात आता ठाणे पोलीस आयुक्तपदी (Thane Police Commissioner) असलेले विवेक फणसाळकर (IPS Thane Vivek Phansalkar) यांची बदली करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांची व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई या पदी नियुक्ती करण्यात आली आहे. फणसाळकरांसोबतच दोन अपर पोलीस महासंचालकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत. आता ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी कोण येणार हा प्रश्न आहे. के. व्यंकटेशन यांची संचालक नागरिक संरक्षण, महाराष्ट्र राज्य मुंबई तर संदीप बिष्णोई यांची महाराष्ट्र संचालक न्यायिक व तांत्रिक महाराष्ट्र राज्य मुंबई या पदी बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या उचलबांगडीनंतर ठाणे पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. कार माइकल रोडवर पार्क करण्यात आलेली हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी हे प्रकरण असेल किंवा मनसुख हिरेन यांचे हत्या प्रकरण असेल या सर्वांचेच धागेदोरे हे ठाणे शहराशी म्हणजेच ठाणे पोलीस आयुक्तालयाशी जोडलेले होते. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त यांची बदली होणार हे निश्चित झाले होते. तसं पाहायला गेलं तर आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्तपदी दोन वर्षांचा काळ कधीच पूर्ण केला होता. त्यांची पोलीस महासंचालकपदी बढती अपेक्षित होतीच, यानिमित्ताने विवेक फणसाळकर यांची पोलीस महासंचालकपदी बढती झालेली आहे. फणसाळकर यांच्या बदलीनंतर ठाणे पोलीस आयुक्तपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेली दोन आठवडे सुरू आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी याकरता अनेकांनी मोर्चेबांधणी केली असून ठाणे पोलीस आयुक्त पदी सेवा ज्येष्ठतेनुसार आयपीएस अधिकाऱ्याची वर्णी लागणार की, सरकारच्या मर्जीतील व्यक्तीची हे काही तासातच स्पष्ट होणार आहे. हे वाचा - Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय एकीकडे राज्य सरकारवर, एवढंच नाही तर राज्याच्या गृहमंत्र्यांवर बदली करता पैसे घेतल्याच्या आरोपावरून गृहमंत्र्यांना राजीनामा देणे भाग पडलं होतं. त्यातच विवेक फणसाळकर यांच्यासोबतच अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. खरंतर सध्या सेवेत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे हे सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ आहेत. मात्र, सरकारने ज्यांची नियुक्ती राज्याचे पोलीस महासंचालक पदी केली ती व्यक्ती अतिशय नाट्यमयरित्या करण्यात आली आणि पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झालेले हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची लॉटरी लागली. त्यांच्यानंतर दिवंगत आयपीएस अधिकारी हिमांशु राय यांचा नंबर होता पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग सध्या वादाच्या भोवऱ्यात असल्याने तर दुसरीकडे केंद्रात प्रतिनियुक्तीला गेलेल्या रश्मी शुक्ला यांच्यामुळे 1988 च्या बॅचचे के. व्यंकटेशन आणि 1989 च्या बॅचचे संदीप बिष्णोई व विवेक फणसाळकर यांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती मिळणार होती, ती आज राज्य सरकारने दिली असून ठाणे पोलीस आयुक्त पद हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असून आता अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची वर्णी ठाणे पोलीस आयुक्त पदी लागणार आहे, याकरता अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांनी मोर्चेबांधणी केली असून राज्य सरकार नेमकी ठाणे पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लावणार यांच्याकडे अनेकांच्या नजरा आहेत. आधीच चहूबाजूंनी आरोपांनी घेरलेल्या राज्य सरकारला आता कोणत्याही वादाच्या भोवऱ्यात अडकायचे नाही. याच कारणाने ठाणे पोलीस आयुक्तपदी त्यांची वर्णी लागेल, त्याची नियुक्ती ही पारदर्शक असेल असेच म्हणावे लागेल. हे वाचा - अबब… शेतकऱ्याच्या शेतात तब्बल 4.25 किलोचा आंबा; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद सेवाज्येष्ठतेनुसार आयपीएस अधिकार्‍यांची नावे आणि त्यांच्या निवृत्तीची दिनांक १) 1989 बॅचचे अधिकारी बी. के. उपाध्याय 31 नोव्हेंबर 2023, प्रज्ञा सदावर्ते 30 जून 2024, संजय कुमार 30 मार्च 2023, राजेंद्र सिंग 30 एप्रिल 2022, 1990 जगजीत सिंग 31 एप्रिल 2024, सदानंद दाते 31 डिसेंबर 2026, अरुणचंद्र कुलकर्णी 31 जानेवारी, 2024 बिपीनकुमार सिंग 30 ऑक्टोबर, 2025 संजयकुमार वर्मा 30 एप्रिल 2028 विनय कारगावकर 30 एप्रिल , 2023  एस. जगन्नाथन 30 मे, 2022 मारिया फर्नांडीस 30 एप्रिल, 2026 पोलिसांची गांधीगिरी! Lockdown चे नियम मोडून फिरणाऱ्यांना तासभर फुकटचा सल्ला २)1992 बॅचचे अधिकारी रतेशकुमार 31 जानेवारी, 2029, अमिताभ गुप्ता 30 जून, 2029, संजीव सिंघल 31 जानेवारी, 2028 ३) 1993 बॅचचे अधिकारी अर्चना त्यागी 30 जानेवारी, 2027, संजय सक्सेना 30 मार्च, 2025, प्रभात कुमार 31 जानेवारी, 2027, प्रशांत बुरडे 30 सप्टेंबर, 2030, 1994 आशुतोष डुंबरे 31 जुलै, 2027 देवेन भारती 31 ऑगस्ट 2028, अनुपकुमार सिंग 31 डिसेंबर, 2028 खरंतर पोलीस आयुक्त पदांच्या बदल्या या सेवाज्येष्ठतेनुसार होणं गरजेचं असतं. मात्र, या बदल्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेला राजकीय हस्तक्षेप पाहता राजकीय नेते आपल्या सोयीप्रमाणे पोलीस आयुक्त पदी त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लावतात याकरता पोलीस आयुक्त पदाचा दर्जा वाढवला जातो किंवा कमी केला जातो, अशी अनेक उदाहरणे आहेत. तर अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी असलेले प्रशांत बोर्डे, देवेन भारती, बी. के सिंग आशुतोष डुंबरे यांच्यासह काही अधिकारी ठाणे पोलीस आयुक्तालय पदी फिल्डींग लावून बसलेत. पण मनसुख हिरेन हत्येप्रकरणाचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजित सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्त पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार की राज्य सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्याची ठाणे पोलीस आयुक्त पदी वर्णी लागणार हे पुढील काही तासातच स्पष्ट होईल.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: IPS Officer, Police commissioner, Thane, Thane police

पुढील बातम्या