मुंबई, 30 जून: राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, अधिवेशनाचा काळावधी वाढवण्यात यावा अशी मागणी भाजप (BJP) कडून करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचेच करण्यावर राज्य सरकार (Maharashtra Government) ठाम आहे. असे असले तरी विरोधी पक्षात असलेल्या भाजपकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी खास रणनिती ठरवली आहे. आज भारतीय जनता पक्षाची मुंबईत (Mumbai) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
आम्ही सरकारला धारेवर धरणार
भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडल्यावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं, दोन दिवसाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक पार पडली. राज्यासमोर खूप प्रश्न आहेत. अधिवेशन जास्त कालावधी झाला असतं तर जनतेला न्याय देता आला असता. पण यापेक्षा कमी कालावधी अधिवेशन ठेवता आले नसते म्हणून दोन दिवसाचे अधिवेशन घेतले आहे. शेतकरी आणि आरक्षण या मुद्यावर आम्ही सरकारला धारेवर धरणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही कोरोनापासून तर आरक्षण या सर्व मुद्दयांवर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देत नाही, घटकपक्षाच्या नेत्याने वाचला तक्रारीचा पाढा
नांदेड जिल्ह्यातील देगलूर मध्ये पोट निवडणूक होणार आहे. त्यात विजय मिळवण्याची रणनीती तयार केली आहे. आधी निवडणूक जाहीर होऊ द्या. आमची रणनीती ठरली आहे. त्यांनी आधी निवडणूक घोषित करण्याची हिंमत दाखवावी असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारचं ढिसाळ नियोजन
राज्यातील अनेक शहर आणि जिल्ह्यांत लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण ठप्प झाले आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं, जगभरातील लोक केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेत आहे. मात्र, राज्य सरकारचे नियोजन ढिसाळ आहे. सभागृहात सर्व विषयावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, Government, Maharashtra, Monsoon, Mumbai, Session