• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • 2019ची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न; अलमट्टी धरण पाण्याचा तिढा कधी सुटणार; आजच्या बैठकीत काय ठरलं?

2019ची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न; अलमट्टी धरण पाण्याचा तिढा कधी सुटणार; आजच्या बैठकीत काय ठरलं?

Almatti Dam: अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये आज महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

  • Share this:
मुंबई, 19 जून: राज्यातल्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर (Kolhapur), सातारा (Satara), सांगली (Sangli) या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पंचगंगा नदीच पाणी पात्राबाहेर आल आहे तर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतेय. या परिस्थितीमुळे आठवण होते ती कोल्हापूर-सांगली या दोन जिल्ह्यांना बसलेल्या महापुराच्या फटक्याची.... 2019 साली आलेला महापूर (2019 flood) अजूनही कोल्हापूरकर आणि सांगलीकर विसरलेले नाहीत पण यंदा हाच महापूर टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने एक पाऊल पुढ टाकलं. त्यानुसार राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) थेट पोहोचले कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस एडीयुरप्पा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत अलमट्टी धरणाबाबत (Almatti Dam) प्रदीर्घ चर्चाही झाली अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वेळेत न केल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पाण्याचा फुगवटा निर्माण होतो. त्यामुळे महापुराची परिस्थिती उद्भवते त्यामुळच जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन कर्नाटक राज्य सरकारशी हा संवाद साधला. यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची बंगलूर येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई तसेच कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव, तसेच जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय कुमार गौतम व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान कृष्णा व भीमा नद्यासंदर्भात येणाऱ्या काळात पूराचे नियंत्रण कशापध्दतीने करता येईल आणि त्यात कोणत्या पध्दतीने दोन्ही राज्याने समन्वय ठेवायचा याची चर्चा झाली. महाराष्ट्राने रिअल टाईम डाटा अक्वीझिशन सिस्टीम (जलहवामान विषयक विनाविलंब माहिती मिळविण्याबाबतची यंत्रणा) बसवली आहे. मात्र कर्नाटक सरकारने ही यंत्रणा अजून बसवलेली नाही. कर्नाटकात ही यंत्रणा तयार झाली तर एकत्रित अलमट्टीची डायनाँमिकली लेवल कंट्रोल करणं शक्य होईल आणि एकंदर येणारा अलमट्टी धरणातील येवा आणि पुढे जाणारा येवा व महाराष्ट्रात पडणारा पाऊस या सगळ्यावर आपण प्रभावीपणे जर नियंत्रण ठेवले तर कुठून किती पाणी सोडायचं आणि कोणत्या धरणात किती पातळी ठेवायची खास करुन अलमट्टीची वर चांगलं नियंत्रण ठेवता येईल अशीही चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. ही बैठक दोन्ही राज्यात योग्य समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 2019चा पूर लक्षात घेता, गतवर्षी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शन अचूक नियोजन झाले होते. यंदाही पश्चिम महाराष्ट्राला पूराचा तडाखा बसू नये यासाठी श्री. पाटील प्रयत्नशील आहेत. आजची भेटही पूर नियंत्रणाच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले.
Published by:Sunil Desale
First published: