जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता 'या' महिन्यात मिळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता 'या' महिन्यात मिळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर! सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा दुसरा हप्ता 'या' महिन्यात मिळणार

7th Pay Commission: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वाढीव वेतनाची थकबाकी आता मिळणार आहे. या संदर्भात राज्य शासनाने अधिसूचना काढली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जून: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Maharashtra Government employees) एक मोठी खुशखबर आहे. कारण, कर्मचाऱ्यांना आता सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) मिळणारी थकबाकी लवकरच देण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना थकबाकीचा दुसरा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. 7व्या वेतन आयोगाची थकबाकी 2019-20 पासून पुढील 5 वर्षांत 5 समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कोविड19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती आणि त्यामुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन 1 जुलै 2020 रोजी 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे देण्याचा निर्णय 1 वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना 1 जुलै 2021 रोजी 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. मोठी बातमी! अखेर पुणे मनपा हद्दीत 23 गावांचा समावेश, महानगरपालिकेची हद्द वाढणार निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जुलै 2021च्या निवृत्तीवेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट 2021 च्या वेतनासोबत अदा कऱण्यात येणार आहे. सर्व जिल्हा परिषद, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम सप्टेंबर 2021 च्या वेतनासोबत देण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात