जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना; कोरोना विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारने आखला खास प्लॅन

तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना; कोरोना विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारने आखला खास प्लॅन

तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना; कोरोना विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारने आखला खास प्लॅन

लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात घेऊन राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने तयार करण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मे: कोरोना विषाणूची तिसरी लाट (Coronavirus Third Wave) येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. सध्याच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग लहान मुलांनाही होत आहे आणि तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक (Covid19 third wave to affect children) असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. राजेश टोपे यांनी म्हटलं, कोरोनाचा संसर्ग लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासोबतच तिसऱ्या लाटेच्या संदर्भात तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाज लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार आहे. दिलासादायक बातमी! कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात महाराष्ट्रातल्या या जिल्ह्याला यश तिसऱ्या लाटेची पूर्वसूचना मिळाली आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्त फोर्स तयार करण्यात येईल. या टास्क फोर्समधील बालरोग तज्ज्ञ हे लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी काम करतील. राज्यातील आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. बेड्सची संख्या वाढवण्यात येत आहे. यासोबतच इतर सुविधा वाढवण्यावरही भर दिला जात आहे. राज्याला रशियातील स्पूटनिक लस उपलब्ध व्हावी यासाठी रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजेच आरडीआयएफ यांच्यासोबत लसीच्या दरांसंदर्भात बोलणी सुरू आहे. ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर खरेदी करायची आहे. या यंत्राच्या तांत्रिक बाबी तपासणीसाठी तीन डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात