जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दिलासादायक बातमी! कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात महाराष्ट्रातल्या या जिल्ह्याला यश

दिलासादायक बातमी! कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात महाराष्ट्रातल्या या जिल्ह्याला यश

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘  असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘ असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

हा (Nanded Corona Update) जिल्हा विदर्भाला खेटून असल्याने कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ (Corona Hotspot) बनत होता. पण तब्बल 55 दिवसांच्या प्रयत्नानंतर आणि कडक निर्बंधांमुळे आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नांदेड (मुजीब शेख), 06 मे : महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचा अहवाल केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केला. अन्य जिल्ह्यांप्रमाणे नांदेड (Nanded Corona Update) जिल्हा देखील कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ (Corona Hotspot) होता. पण तब्बल 55 दिवसांच्या प्रयत्नानंतर नांदेड जिल्ह्यात आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मार्चमध्ये नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. त्यापूर्वी विदर्भातील काही जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार निर्माण झाला होता. तेव्हा विदर्भाला लागून असलेल्या सीमांवर तपासणी सुरू करण्यात आली. 12 मार्च रोजी 360 रुग्ण आढळले. त्यावेळी हा आकडा मोठा होता. प्रशासनाने तेव्हाच कडक निर्बंध लावले. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. रुग्णसंख्या वाढतच गेली. 23 मार्च रोजी 1333 रुग्ण आढळले आणि स्थानिक प्रशासनाने टाळेबंदी लावण्याचा निर्णय घेतला. 25 मार्च ते 4 एप्रिल अशी अकरा दिवसांची टाळेबंदी लावण्यात आली. या काळात टेस्टिंगवर भर देण्यात आला. मोठ्या संख्येने रुग्ण वाढ होत असल्याने सरकारी आणि खासगी रुग्णालयात बेड देखील वाढवण्यात आले. दोन सरकारी रुग्णालयात 1100 बेड, आयुर्वेदिक रुग्णालयात 100 बेड, नवीन कोविड रुग्णालयात 200 बेड आणि 52 खासगी रुग्णालयात तब्बल 1500 बेडची व्यवस्था करण्यात आली. हे वाचा -  IPL 2021: आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर गांगुलीची प्रतिक्रिया, म्हणाला… रुग्ण मोठ्या संख्येत वाढत असतानादेखील बेड आणि ऑक्सिजनची कमरता भासली नाही. 6 एप्रिल ते 11 एप्रिल या पाच दिवसात 8507 रुग्ण आढळले. आरोग्य विभागावर मोठा ताण निर्माण झाला. रुग्ण वाढत असताना देखील ‘टेस्ट, ट्रेस आणि ट्रीट’ ही मोहीम प्रशासनाने राबवली. स्थानिक टाळेबंदी संपल्यानंतर राज्य सरकारचे निर्बध लागले. नंतर 15 एप्रिलपासून राज्य सरकारने कडक निर्बंध लावले. एप्रिलच्या शेवटी मात्र नांदेडमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात आली. मे महिन्याच्या सुरुवातीला बऱ्यापैकी फरक पडला. मागील पाच दिवसापासून 500 पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. राज्य सरकारने लावलेल्या टाळेबंदी आणि ब्रेक द चेन मोहिमेला फायदा झाला असे म्हणावे लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात