मुंबई, 8 सप्टेंबर- बॉलिवूड**(Bollywood Actress**) अभिनेत्री आणि मॉडेल अलंकृता सहायच्या(Alankrita Sahai) घरी चोरीसारखा धक्कादायक प्रकार घडला आहे. अलंकृता चंदिगढ सेक्टरमध्ये एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहते. 7 तारखेला दुपारी काही अज्ञात व्यक्तींनी तिच्या घरात प्रवेश करत, तिला चाकूचा धाक दाखवत ही लुट केली आहे. 1..2 नव्हे तर तब्बल 6.50 लाखांचा मुद्देमाल या अज्ञातांनी लंपास केला आहे. असं अलंकृताने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
अभिनेत्री अलंकृताचे आईवडील दिल्लीत राहतात. तर ही 27 वर्षीय अभिनेत्री एकटी राहते. तिला एकटीला घरात पाहून 3 अज्ञातांनी तिच्या घरात जबरदस्ती घुसून तब्बल 6.50 लाखांची लुट केली आहे. अलंकृताने काही दिवसांपूर्वी फर्निचर खरेदी केलं होतं. अलीकडेच या फर्निचरची डिलिव्हरीसुद्धा झाली होती. यावेळी काही लोकसोबत आले होते. या अज्ञात चोरांमधील एक व्यक्ती त्यावेळी आपल्या घरी आल्याचा अंदाज अभिनेत्रीने व्यक्त केला आहे. (हे वाचा: निर्मात्या होत्या अरुणा भाटिया; अक्षयच्या या सिनेमांची केली होती निर्मिती ) संशयितांनी अभिनेत्रीच्या घरी घुसून तिला चाकूचा धाक दाखवला. तसेच तिच्याकडून तिचं ATM कार्ड घेऊन तिच्या खात्यातून तब्बल 50 हजार रुपये काढून घेतले.अभिनेत्रीने स्वतःचाबचाव करण्यासाठी स्वतःला घरातील बाथरुममध्येमध्ये बंद करून घेतलं होतं. तसेच नंतर बचावासाठी आरडाओरड करताच या चोरट्यांनी पळ काढल्याच अभिनेत्रीने म्हटलं आहे. अलंकृता सहाय ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटात झळकली होती. तसेच ती ;लव्ह स्क्वेयर फिट’ चित्रपटातसुद्धा दिसून आली होती. शिवाय ती एक मॉडेलसुद्धा आहे. तिने अनेक राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय किताब आपल्या नावावर केले आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

)







