Home /News /aurangabad /

आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियमाचं उल्लंघन, धक्कादायक VIDEO आला समोर

आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियमाचं उल्लंघन, धक्कादायक VIDEO आला समोर

जिथं कोरोनाचे निर्बंध अद्याप कडक आहेत, अशा बीडमध्ये युवा सेनेने कोरोनाचे नियम धाब्यावर चढविण्यात आल्याचं दिसून येत आहे.

बीड, 12 ऑगस्ट : कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) असणाऱ्या बीडमध्ये (Beed News) शिवसेनेच्या युवा संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. जिथं कोरोनाचे निर्बंध अद्याप कडक आहेत, अशा बीडमध्ये शिवसेनेकडून कोरोनाचे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी नसतांना नाट्यगृहातचं शिवसेनेकडून भाषणबाजी करण्यात आली असून हजारो युवा सैनिकांची संवाद दौऱ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत, मास्क न लावता हजर राहिल्यामुळे कोरोना बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाचं आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. सत्ताधारी शिवसेनेला नियम नाहीत का ? सर्वसामान्य बीडकर असा प्रश्न विचारत आहेत. (Violation of Corona Rules by Youth Sena in Beed video viral ) युवासेना सचिव वरून सरदेसाई मराठवाड्याच्या संवाद दौर्‍यावर आहेत. आज त्यांचा दौरा बीडमध्ये होता, दरम्यान यावेळी सरदेसाई यांनी सेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून नाट्यगृह, सिनेमागृह, धार्मिक स्थळ आणि सामूहिक कार्यक्रमास बंदी असताना मात्र, युवा सेनेकडून शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कोरोना नियमांचा फज्जा उडवत संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये विना मास्क सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला होता. या कार्यक्रमासंदर्भात सचिव वरून सर्देसाई यांना विचारले असता हाच नियम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदींना का लावला नाही तो लावला असता तर दुसरी लाट आली नसती, निवडक कार्यकर्ते घेऊन हा मेळावा होत आहे असं ते म्हणाले. हे ही वाचा-चिंताजनक! राज्यात एका दिवसातच वाढला मृतांचा आकडा, पुण्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बधितांची रुग्ण संख्या वाढते आहे. अशातच या मेळाव्याचे आयोजन होत असल्याने, गर्दी करून कोरोनास निमंत्रण दिलं जातंय का.? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. या मेळाव्यास जिल्हाभरातून सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तर या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग बरोबर कार्यकर्त्यांनी कोरोनाचा पुरता फज्जा उडवला आहे. यासंदर्भात बीडच्या जनतेकडून संताप व्यक्त केला जात असून त्यासाठी वेगळी नियमाने सामान्यांसाठी वेगळा नियम का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Aaditya thackeray, Beed news, Corona hotspot, Corona spread, Udhav thackarey

पुढील बातम्या