जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Maharashtra Corona updates: राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आज 63729 रुग्णांचे निदान, 398 मृत्यू

Maharashtra Corona updates: राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आज 63729 रुग्णांचे निदान, 398 मृत्यू

Maharashtra Corona updates: राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आज 63729 रुग्णांचे निदान, 398 मृत्यू

Maharashtra: राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत आज मोठी वाढ झाली आहे. तर मृतकांचा आकडाही वाढला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona virus spike) रोखण्यासाठी ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, असे असातनाही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसत आहे. आज राज्यात तब्बल 63,729 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतकांचा आकडाही वाढला आहे. आज 398 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज राज्यात 45,335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 30,04,391 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 81.12 एवढे झाले आहे. आज 398 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून राज्यातील मृत्यू दर 1.61 % इतका झाला आहे. राज्यात 6,38,034 सक्रिय रुग्ण राज्यात सध्यस्थितीत एकूण 6,38,034 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 1,16,665 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 84,378 रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात 84,038 सक्रिय रुग्ण आहेत. वाचा:  सहकार्य न केल्यास कडक Lockdown, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा आज राज्यात 63,729 रुग्णांची नोंद  आज राज्यात 63,729 रुग्णांची नोंद झाली असून सर्वाधिक रुग्ण हे ठाणे मंडळातील आहेत. आज ठाणे मंडळात 17,635 रुग्णांचे निदान झाले आहे. पुणे मंडळात 13,891 रुग्णांचे निदान झाले आहे. तर नागपूर मंडळात 10,559 रुग्णांचे निदान झाले आहे. पाहूयात आज कुठल्या मंडळात किती रुग्णांचे निदान झाले. ठाणे मंडळ - 17635 नाशिक मंडळ - 9286 पुणे मंडळ - 13,891 कोल्हापूर मंडळ - 2106 औरंगाबाद मंडळ - 3095 लातूर मंडळ - 4893 अकोला मंडळ - 2264 नागपूर मंडळ - 10,559

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात