मुंबई, 16 जून: महाराष्ट्रात कोरोना (Corona in Maharashtra) बाधित रुग्ण आणि मृतकांची संख्या लपवली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत होता. भाजपच्या (BJP) या आरोपानंतर आता राज्यातील कोविड मृतकांच्या संख्येत अचानक वाढ (suddenly rise in Covid death) झाल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात गेल्या दहा दिवसांत तब्बल 15 हजार जुन्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने (Maharashtra Government) खरोखरच मृत्यू लपवले होते का? असा प्रश्न विचारला जात आहे.
पोर्टलमध्ये आज राज्यात आज एक हजार मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हे सर्व मृत्यू काही आठवड्यापूर्वी झाले आहेत. गेल्या 10 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येते की दररोज साधारणत: दीड हजारांहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे आणि हे सर्व मृत्यू काही दिवसांपूर्वी झाली होती.
पाहूयात कुठल्या दिवशी किती जुन्या मृत्यूची नोंद
10 जून - 1532
11 जून - 2213
12 जून - 1606
13 जून - 2288
14 जून - 1392
15 जून - 1070
राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, 237 मृत्यूंपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 999 ने वाढली आहे. हे 999 मृत्यू, नाशिक-240, पुणे-135, अहमदनगर-129, नागपूर-94, सातारा-81, ठाणे-49, सांगली-28, लातूर-24, जळगाव-23, बीड-22, कोल्हापूर-22, रत्नागिरी-19, नांदेड-17, परभणी-15, औरंगाबाद-14, भंडारा-14, हिंगोली-11, अकोला-9, बुलढाणा-8, पालघर-8, रायगड-8, वाशिम-8, चंद्रपूर-7, उस्मानाबाद-6, नंदूरबार-3, वर्धा-2, गडचिरोली-1, जालना-1 आणि यवतमाळ-1 असे आहेत.
राज्यात 115390 कोविड मृत्यू
राज्यात आतापर्यंत एकूण 115390 रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. आज राज्यात नवीन 237 मृत्यूंची नोंद झाली आहे. 237 मृत्यूंपैकी 144 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 93 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या आकडेवारीत 11 हजार 500 रुग्णांच्या मृत्यूची नोंदच झाली नसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी भाजपने केला होता. उद्धव ठाकरे सरकार केवळ पीआर करून बेस्ट सीएम होण्याचे गोडवे गात आहे. मात्र, आकडेवारी कमी दाखवून आणि लपवून सत्य लपणार नाही असं ट्विटही भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं होतं.
भाजपच्या आरोपावर राज्य सरकारने दिलं होतं स्पष्टीकरण
कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि मनपा यांचेकडे नियमित पाठपुरावा केला जातो. रुग्ण व मृत्यू यांच्या नोंदी करण्याची प्रक्रिया लक्षात घेतल्यास त्यामधील विविध टप्पे आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजून येतात. रुग्ण अथवा मृत्यूची नोंद घेऊ नका, अशी कोणतीही सूचना दिली जात नसल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra