मुंबई, 10 जून: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र हा हॉटस्पॉट बनला होता. कोरोनाच्या या संकटावर राज्य सरकारने (Maharashtra Government) शक्य ते प्रयत्न करत मात केली मात्र, याच दरम्यान कोविडमुळे लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू (1 lakh people died due to covid) झाला. पण राज्य मृतकांचा आकडा लपवत असल्याचा आरोप भाजप सातत्याने करत आहे. भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येणाऱ्या या आरोपा दरम्यान आता असे वृत्त समोर आले आहे की, राज्यात 11 हजार 500 रुग्णांच्या मृत्यूची नोंदच झालेली नाहीये.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की, राज्यातील रुग्णांची, मृतकांची आकडेवारी ही लपवण्यात येत नाही तर जी आहे ती आकडेवारी जाहीर करण्यात येते. मात्र, याच दरम्यान राज्य सरकारकडे कोरोना बाधितांच्या 11 हजार 617 मृत्यूंची नोंद झाली नसल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे. या वरुन भारतीय जनता पक्षाने आता पुन्हा एकदा ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
आगामी विधानसभेत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र? शरद पवारांचे सूचक विधान
आता तरी अधिकचे झालेले मृत्यू प्रामाणिकपणे दाखवा
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "कोरोनाचे कमी-अधिक मृत्यू हा प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठेचा प्रश्न नाही, तर कोरोनाविरोधातील लढ्यातील तो महत्त्वाचा दुवा, संदर्भ आहे. त्यामुळेच त्यातील पारदर्शिता अधिक महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रातील मृत्यू लपवू नका, म्हणून सातत्याने पत्रव्यवहार केला, अनेकदा आवाज उठविला. पण, सरकार आवाज उठविणार्यांना महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्राची बदनामी करणारे ठरविण्यात मग्न होते. असो, आता तरी अधिकचे झालेले मृत्यू प्रामाणिकपणे दाखवा. आणि माझी आणखी एक विनंती आहे की, आता माध्यमांना महाराष्ट्रद्रोही ठरवू नका".
With 1lac Covid patients deaths, Mah ranking @ #1 in country and #10 in world,now appx 11,500 deaths seem2have not been updated. @OfficeUT with #PR & #BestCm had Laurels & Praises from selective people but by hiding figures&showing lower nos such SINS of #MVA govt cannot be cover
— Keshav Upadhye (@keshavupadhye) June 10, 2021
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 1 लाख कोविड बाधितांच्या मृत्यू झाल्याने महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर तर जगात 10व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यात आता 11,500 मृत्यू लपवल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे सरकार केवळ पीआर करून बेस्ट सीएम होण्याचे गोडवे गात आहे. मात्र, आकडेवारी कमी दाखवून आणि लपवून सत्य लपणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra