मुंबई, 2 मे: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना (Corona) स्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट (covid patients number decrease) होत असल्याचंही त्यांनी सांगितलं असून रिकव्हरी रेटही वाढला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांतील रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून आता इतर 24 जिल्ह्यांतील रुग्णसंख्या कमी करण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच आरोग्यमंत्र्यांनी एक चांगली बातमी दिली आहे ती म्हणजे कोविशिल्ड लसीचे 9 लाख डोस आज उपलब्ध झाले आहेत. पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 5 टक्क्यांनी घसरण महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांतील रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. तर इतर 24 जिल्ह्यांत रुग्णसंख्या अद्यापही कायम आहे त्यामुळे या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या कमी करण्यावर भर आहे. राज्यातील बाधितांच्या पॉझिटिव्ही रेटमध्ये पाच टक्क्यांनी घसरण झाली आहे. पूर्वी पॉझिटिव्हिटी रेट 27 टक्के इतका होता आता 22 टक्के इतका झाला आहे. कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध होत नव्हत्या. कोविशिल्ड लसीचे आज 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत, त्यामुळे दोन-तीन दिवस पुरेल इतका हा साठा आहे. आवश्यक आहे तितक्या लसींचा पुरवठा केंद्राकडून होत नाहीये. EXCLUSIVE: Remdesivir तुटवडा होणार दूर; ग्लोबल टेंडरमुळे राज्याला 10 दिवसांत मिळणार औषधांचा मोठा साठा कोविशिल्ड 13 लाख आणि कोवॅक्सिन 4 लाख डोसची ऑर्डर राज्यसरकारने दिली आहे. त्यामुळे लवकरच हे लसींचे डोस उपलब्ध होतील आणि नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल. तरुणांनी नाव नोंदणी केल्याशिवाय लसीकरण केंद्रांवर गर्दी करु नये असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे. स्पुटनिक लसही लवकरच उपलब्ध होईल असंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं. अदर पुनावाला हे परदेशात आहेत. ते भारतात परतल्यावर त्यांच्यासोबत चर्चा करुन कोविशिल्डच्या पुरवठ्या संदर्भात सविस्तर चर्चा करुन मागणी करु. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची केंद्राकडे मागणी रेमडेसिवीरची आवश्यकता जास्त आहे. त्याप्रमाणे आम्ही मागणी केली आहे मात्र, मागणी करुनही रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाहीये. सांगली, सातारा, कोल्हापूर, बुलडाणा या जिल्ह्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण वाढल्याने स्थानिक प्रशासनाने तेथे कठोर लॉकडाऊन जाहीर केला आहे. केंद्र सरकारला अतिरिक्त ऑक्सिजनची मागणी केली आहे आणि केंद्राने तसे उपलब्ध करुन द्यावे. राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे आज रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, 63 हजारवरून रुग्णसंख्या खाली आली आहे, मृत्यू मागील आठवड्यात 788 होते आता 368 रुग्णांचा मृत्यू झाला केंद्र सरकारने ही महाराष्ट्रात 12 जिल्ह्यात घट होताना दिसत असल्याचे मान्य केले गेल्या काही दिवसांत राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट 12 जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात घट आहे 24 जिल्ह्यांतील रुग्णसंख्येत घट करण्यावर आपला भर आहे महाराष्ट्र उर्वरित जिल्हात कोरोना रूग्ण कमी करणे हे ध्येय असेल पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के घट झाली, टेस्ट कमी केले नाहीत, अडीच लाख टेस्ट करत आहे रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट 27 टक्क्यांवरुन 22 टक्क्यांवर डिस्चार्ज रेट सुद्धा वाढत आहे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली रिकव्हरी रेट 84.7 टक्के आहे आणि देशाचा 81 टक्के इतका आहे देशाच्या रिकव्हरी रेटपेक्षा राज्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे रेमडेसिवीर उपलब्धता कमी आग्रही भूमिका मांडली केंद्र सरकारकडे… 9 मे पर्यंत इंजेक्शन साठा वाढणे म्हटले 49 हजार दररोज उपलब्ध करून दिले जात आहे इंजेक्शन सध्या दिवसाला 40 हजार रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध होत आहे रेमडेसिवीरसाठी ग्लोबल टेंडर काढले होते, आज 3 लाखांच्या आसपास रेमडेसिवीर उपलब्ध होतील ओडिशातून महाराष्ट्रात ऑक्सिजन येत आहे, वाहतूकीसाठी लागणारा वेळ कमी झाला पाहिजे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.