..यावरून नाराज आहेत अजित पवार, म्हणूनच दिला अचानक राजीनामा?

मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबात मोठे वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 03:21 PM IST

..यावरून नाराज आहेत अजित पवार, म्हणूनच दिला अचानक राजीनामा?

मुंबई,27 सप्टेंबर: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाचा शुक्रवारी सायंकाळी राजीनामा दिला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

पक्षात नेतृत्त्व कोणाचे यावरून अजित पवार नाराज..

पार्थ पवार यांना डावलून रोहित पवार यांना अधिक प्रमोट करणे तसेच राष्ट्रवादीत नेतृत्त्व कोणाचे यावरून मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज आहेत. त्यामुळे ते मुख्य निर्णय प्रक्रियेपासूनही दूर आहेत. त्याचप्रमाणे मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबात मोठे वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिले आहेत. शरद पवार यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूचक वक्तव्य केले होते.

राजकीय चर्चेला उधाण..

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरूवात झाली असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे आहे. अजित पवार यांनी ई-मेलवरून विधानसभाध्यक्षांना राजीनामा पाठवला आणि त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. राजीनामा पत्रात कारण नाही दिलेले, फक्त राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली. विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर केला. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याविरुद्ध ED ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. ED ने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवारांनी मोठे आंदोलन उभे केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे त्यात दिसले नाहीत.

Loading...

अजित पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय हा अचानक घेण्यात आला असून त्याबाबत पक्षातल्या कुणालाच माहिती नव्हती असेही बोलले जात आहे. अजित पवारांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राजीनाम्याचं खरे कारण हे राजकीय असले पाहिजे, असेही म्हटले आहे. या आधीही काही वेळा अजित पवारांनी धक्कातंत्राचा वापर करत निर्णय घेतले होतो. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने पक्षाची बदनामी झाली होती. त्यातच अनेक नेत्यांनी अजित पवारांच्या राजकारणामुळे आम्हाला पक्ष सोडावा लागतोय, असे सांगत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

VIDEO:कुणालाही न सांगता अजित पवारांनी दिला राजीनामा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 07:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...